About
"वाचनकट्टा" या उपक्रमास 18 मार्च 2020 पासून सुरुवात करण्यात आलेली असून सदर उपक्रमात एखादी बोधकथा, प्रेरणादायी उतारा,थोरांचे विचार,सुंदर विचार,प्रेरणादायी प्रसंग असे जे काही उत्तम वाचनात येईल त्याचा एक माझ्या स्वतः च्या आवाजात ऑडिओ तयार करण्यात येऊन तो प्रकाशित करण्यात येतो. वाचनकट्ट्याचे संपूर्ण महाराष्ट्रासह दुबई व सिंगापूर मध्ये जवळपास 8 ते 9 हजार श्रोते आहेत.वाचनकट्ट्याच्या माध्यमातून केवळ दर्जेदार साहित्य श्रोत्यांपर्यंत पोचविणे हाच एकमेव हेतू आहे.वाचनकट्ट्याचा ऑडिओ रेकॉर्ड करतांना लेखकाच्या नावाचा आवर्जून उल्लेख करण्यात येतो. सदर साहित्याचा कोणताही दुरुपयोग वाचनकट्ट्याच्या माध्यमातून केला जात नाही.आपणही आपले अथवा आपल्या वाचनात आलेले निर्विवाद व दर्जेदार साहित्य वाचनकट्ट्यासाठी पाठवू शकता.