दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
प्लॅस्टिकचे कण शरीरात गेल्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात? | BBC News Marathi
जमिनीत मिसळलेल्या प्लॅस्टिकमुळे शेकडो एकर जमीन खराब झाल्याचं एक संशोधन सांगतं. मायक्रोप्लॅस्टिकचे कण पोटात गेल्याने अनेक गंभीर आजारही होऊ शकतात. प्लॅस्टिकच्या प्रदूषणापासून स्वतःला कसं वाचवायचं? आणि हे प्रदूषण कमी करण्याचे उपाय काय आहेत? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.
लेखन - आशय येडगे
निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – अरविंद पारेकर
2/2/2024 • 4 minutes, 9 seconds
पेटीएम वॉलेटमध्ये पैसे ठेवणं कितपत सुरक्षित? BBC News Marathi
भारतात सुमारे 9.3 कोटी लोक पेटीएम वापरतात. पण 31 जानेवारी 2024 ला रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली.
आता पेटीएम वापरणाऱ्या ग्राहकांवर याचा नेमका काय परिणाम होईल? रिजर्व्ह बँकेने कोणते निर्बंध लादले आहेत?
भारतीय डिजिटल पेमेंट क्षेत्रात एकेकाळी पहिल्या नंबरवर असणाऱ्या पेटीएमवर अशी वेळ का आली?
पाहा या सोपी गोष्ट मध्ये.लेखन - आशय येडगे, गुलशनकुमार वनकर
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले
2/2/2024 • 5 minutes, 48 seconds
मेंदूत चिप बसवली तर फक्त विचार करून काॅम्प्युटर चालवता येईल का? | BBC News Marathi
उद्योगपती इलॉन मस्क यांच्या कंपनीने माणसाच्या मेंदूत चिप बसवण्याचा प्रयोग यशस्वी ठरल्याची माहिती दिलीय. आता मेंदूतल्या विचारांच्या जोरावर मोबाईल, कम्प्युटर किंवा कोणतंही डिजिटल डिव्हाईस चालवता येईल असं मस्क म्हणालेत. नेमका हा प्रयोग काय आहे? शस्त्रक्रिया करून मेंदूत चिप बसवली तर त्याचा माणसावर काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.
निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – निलेश भोसले
2/1/2024 • 4 minutes, 19 seconds
म्यानमार सीमेवर भारत कुंपण का घालणार? | BBC News Marathi
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
1/30/2024 • 4 minutes, 1 second
गर्भाशयाच्या कॅन्सरपासून ही लस संरक्षण देईल का? BBC News Marathi
दरवर्षी सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भशयाच्या मुखाच्या कॅ न्सरमुळे जगभरात तब्बल ३ लाख महिलांचा मृत्यू होतो. पण एका नवीन लशीमुळे या गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका नव्वद टक्के कमी होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. काय आहे ही HPV लस? कोणत्या कॅन्सरपासून ही लस संरक्षण देऊ शकते? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा ही लस घेतली की किती वर्ष संरक्षण मिळू शकतं? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.लेखन - आशय येडगे
निवेदन – विशाखा निकम
एडिटिंग – निलेश भोसले
1/26/2024 • 3 minutes, 58 seconds
कोरोनासारखीच आणखीन एक महामारी येईल का? | BBC News Marathi
जानेवारी 2024 ला दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसुस यांनी भविष्यात कोरोनापेक्षा गंभीर आजाराची साथ येऊ शकते असा इशारा दिलाय. 'Disease X' म्हणजे नेमकं काय? यामुळे आणखीन एक जागतिक साथ येऊ शकते का? आणि भविष्यात असा रोग आलाच तर त्यासाठी काय तयारी केली जात आहे? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात.
लेखन - आशय येडगे
निवेदन – सिद्धनाथ गानू
एडिटिंग – निलेश भोसले