जगातल्या प्रत्येक घडामोडीचा आपल्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. त्यामुळे दर आठवड्याला दुनियेतली एक महत्त्वाची गोष्ट आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
टोयोटानं खरंच इलेक्ट्रिक कार बॅटरीचा प्रश्न मिटवलाय का? BBC News Marathi
ऑक्टोबर 2023 मध्ये जगातल्या सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनी टोयोटानं दावा केला की ते लवकरच इलेक्ट्रिक कार्ससाठी एक अशी बॅटरी बनवणार आहेत जिच्यावर गाडी 1200 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापू शकेल. इतकंच नाही, तर ही बॅटरी फक्त दहा मिनिटांत रिचार्ज होऊ शकेल.
टोयोटा कंपनीचे प्रमुख कोजी साटो यांनी टोकियोमध्ये ही घोषणा केली, ते म्हणाले की हा इलेक्ट्रिक कार्ससाठीच नाही तटोयोटानं खरंच इलेक्ट्रिक कार बॅटरीचा प्रश्न मिटवलाय का? गोष्ट दुनियेचीमध्ये या भागात आपण याचंच उत्तर शोधणार आहोत.र वाहन उद्योगासाठी एक मोठा क्रांतिकारी शोध आहे.
1/30/2024 • 17 minutes, 1 second
पॅरिस ऑलिंपिक 2024 च्या आयोजनासाठी तयार आहे का?
2024 मध्ये जगातला सर्वात मोठा क्रीडा सोहळा अर्थात ऑलिंपिकचं आयोजन फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये केलं जाणार आहे. त्यासाठी शहरात तयारी सुरू आहे. पण पॅरिसच्या सीन नदीचं प्रदूषण, मेट्रो लाईन्सचं अर्धवट काम आणि राजकीय आंदोलनं अशा गोष्टींचं आव्हान आयोजकांसमोर आहे.
1/9/2024 • 17 minutes, 6 seconds
2024 मध्येही वर्क फ्रॉम होम सुरू राहील का? BBC News Marathi
कोव्हिडच्या जागतिक साथीनंतर करोडो कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होम ही सामान्य गोष्ट बनली होती. साथीच्या तीन वर्षांनंतर अनेक कर्मचारी आता ऑफिसात परतले आहेत, पण काही क्षेत्रांमध्ये अजूनही कर्मचारी घरून काम करण्याला प्राधान्य देत आहेत. तर कंपन्या आता आपल्या कर्माचाऱ्यांना ऑफिसमध्ये परतण्याचा आग्रह करताना दिसत आङेत. अर्थात प्रत्येक देशात परिस्थिती वेगळी आहे. मग आता यापुढच्या काळात कामाचं स्वरूप कसं असेल? ‘वर्क फ्रॉम होम’मुळे खरंच काम होतं का
1/1/2024 • 14 minutes, 49 seconds
मायग्नेन - डोकेदुखीच्या या प्रकारावर खरंच 'हे' औषध काम करेल का? BBC News Marathi
सप्टेंबर 2023 मध्ये युनायटेड किंग्डम म्हणजे युकेनं एक घोषणा केली, जी फक्त युकेच नाही तर कदाचित जगभरातच लोकांच्या आयुष्यात खूप मोठा बदल आणू शकते.
युकेमधली नवीन औषधांना मंजुरी देणारी संस्था नॅशनल हेल्थ अँड केअर एक्सलंस अर्थात NICE ने तेव्हा एका नवीन मायग्रेनरोधक औषधाला मंजुरी दिली.
मायग्रेन म्हणजे तीव्र डोकेदुखी हा एक अतिशय गुंतागुतींचा आजार आहे. जगभरात जवळपास एक अब्ज लोकांना त्याचा त्रास होतो.
या आजारात डोकेदुखी इतकी जास्त होते की रोजचं काम करणंसुद्धा कठीण होतं आणि याचा परिणाम मग नातेसंबंधांवरही होतो.
ज्यांना हा आजार आहे, अशा लोकांनाही हे नवं औषध दिलं जाऊ शकतं, असा दावा नाईसनं केला आहे.
गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात आपण हाच प्रश्न विचारतोय, की मायग्रेनवरच्या उपचारांमध्ये आता काही बदल होणार आहे? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
12/23/2023 • 14 minutes, 40 seconds
भारताचा आणखी एक शेजारी बांगलादेश आता अस्वस्थ का होतोय? BBC News Marathi
बांगलादेशाची अर्थव्यवस्था आशिया-पॅसिफिक प्रदेशातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पाश्चिमात्य देशांमधल्या अनेक मोठ्या फॅशन कंपन्यांसाठी बांगलादेश हा मोठा कपडा पुरवठादार आहे.
पण सध्या निषेध मोर्चे आणि वाढती महागाई यांमुळे बांगलादेशच्या आर्थिक यशावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
पुढच्या वर्षी जानेवारीत बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पण त्याआधी पंतप्रधान शेख हसीना यांच्या वर्चस्वाला सामान्य जनता आव्हान देताना दिसते आहे. विरोधी पक्ष म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात बीएनपी हसीना यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकते आहे.
निवडणुकीआधी तटस्थ अंतरीम सरकार स्थापन झालं नाही, तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची त्यांची तयारी आहे. शेख हसीना यांच्यावर लोकशाही कमकुवत करण्याचा आरोप लावला जातो आहे, पण हसीना यांनी तो आरोप नाकारला आहे. त्या हजारो आंदोलकांवर कडक कारवाई करतायत.
सरकार आणि विरोधक आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याचं दिसतंय. बांगलादेशात अशी उलथापालथ का माजते आहे, याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहे आजची गोष्ट दुनियेची. मूळ पॉडकास्ट - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
12/16/2023 • 17 minutes, 8 seconds
गाझा डायरी : इस्रायल हमासच्या युद्धात गाझामध्ये अडकलेल्यांच्या गोष्टी | BBC News Marathi
इंग्रजी शिक्षिका फरीदा आणि खालिद हा एक वैद्यकीय पुरवठादार गाझामधल्या युद्धात जिवंत राहण्यासाठीचा त्यांचा संघर्ष अत्यंत खासगी व्हॉईस संदेशांमधून जगाला सांगतायत.गाझामध्ये बिघडत चाललेल्या मानवतावादी संकटात अपार नुकसान होऊनही ते जिद्दीने तग धरून आहेत. गाझा डायरीची निर्मिती हया अल बदरनेह, लारा एल्गेबाली, ममदौह अकबिक मोहम्मद शलाबी आणि मेरी ओ'रेली यांनी केली होती.संपादन - रेबेका हेन्शके आणि सायमन कॉक्स
मिक्सिंग - ग्रॅहम पुड्डीफूटबीबीसी वर्ल्ड सर्व्हिससाठी बीबीसी अरेबिक तपास उत्पादन.मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
ऑडिओ एडिटर - तिलक राज भाटिया
12/4/2023 • 16 minutes, 51 seconds
खूप झाला फराळ? आता पोटाची काळजी घ्या, कारण पोटाचा 'हा' प्रॉब्लेम आहे (BBC News Marathi)
आपण आयुष्यभर खातच असतो. खासकरून सणावारांना. आणि मग पोटाचं काही बिघडलं की आपण तब्येतील किंवा अन्नालाच दोष देतो.
आपल्या पोटाचं शास्त्र आपल्याला कधी समजलंय का? ऐका ही गोष्ट दुनियेची
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
11/18/2023 • 15 minutes, 29 seconds
भारत आणि चीन कधी मित्र होऊ शकतात का? BBC News Marathi
ऑगस्ट 2023 मध्ये भारत आणि चीनमधला तणाव पुन्हा वाढला. एकमेकांवरच्या विश्वासाला तडे गेले आणि सीमेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
दोन्ही देशांनी एकमेकांना संयमानं वागण्याचा सल्ला दिला. झालं काहीच नाही, पण दोन्ही देशांमधली मतभेदांची दरी आणखी वाढली.
जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या या दोन देशांत अनेक दशकांपासून सीमावाद सुरू आहे. पण तणावामागे केवळ हे एकच कारण नाही.
मग हे दोन्ही देश आपल्यातलं नातं सुधारू शकतात का, सारं काही आलबेल बनू शकतं का? गोष्ट दुनियेचीमध्ये या आठवड्यात याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत.
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबी सी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
10/28/2023 • 16 minutes, 31 seconds
इस्रायलवर हमासचा हल्ला, आता पॅलेस्टाईनचं भवितव्य काय असेल? BBC News Marathi
7 ऑक्टोबर 2023. पॅलेस्टाईन कट्टरवादी गट हमासनं इस्रायलवर आजवरचा सर्वात मोठा हल्ला केला. इस्रायलनंही प्रत्युत्तरादाखल हमासच्या ताब्यात असलेल्या गाझा पट्टीवर क्षेपणास्त्रांचा मारा केला.
पण फक्त गाझा आणि इस्रायलच धुमसत नाहीये. तर इस्रायलच्या ताब्यातल्या वेस्ट बँक प्रदेशामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टिनी लोकांसाठीही 2023 हे वर्ष सर्वात हिंसक ठरलं आहे.
पण सध्या केवळ वेस्ट बँकच पॅलेस्टिनी प्रशासनाच्या ताब्यात आहे तर गाझा पट्टीवर हमास या कट्टरतावादी संघटनेनं ताबा मिळवला आहे.
गेल्या तीन दशकांत या हमास आणि इस्रायलमध्येच प्रामुख्यानं हिंसक संघर्ष होत आला आहे. पण आत्ताच्या हल्ल्यानंतर पुढे काय होऊ शकतं?
ऐका ही गोष्ट दुनियेची.
संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
10/21/2023 • 17 minutes, 38 seconds
हे आदिवासी अमेझॉनचं जंगल वाचवू शकतात का? BBC News Marathi
21 सप्टेंबर 2023. ब्राझिलच्या अमेझॉनच्या जंगलात राहणाऱ्या आदिवासींमध्ये अशी आनंदाची, उत्साहाची लहर पसरली. यामागचं कारण होतं तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं दिलेला एक ऐतिहासिक निर्णय. पिढ्यानपिढ्या या जंगलांवर आदिवासींचा अधिकार होता आणि आता तो कोर्टानं कायम ठेवला आहे.
या निर्णयामुळे इथे आदिवासींसाठी आरक्षित जमिनींवर मर्यादा आणण्याच्या प्रयत्नांना आता खीळ बसू शकते. खरंतर एप्रिल 2023मध्ये अमेझॉनमधल्या सहा हजारांहून अधिक आदिवासींनी देशाची राजधानी ब्राझिलियामध्ये आंदोलन केलं होतं. राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लूला डिसिल्व्हा उर्फ लूला यांनी अमेझॉनच्या जंगलांचं आणि तिथल्या आदिवासींचं रक्षण करण्याचं निवडणुकीत दिलेलं वचन पूर्ण करावं, अशी त्यांची मागणी होती.
तुम्हाला आठवत असेल की लूला आता परत निवडणून येण्याआधी जायर बोल्सेनारो ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदी होते. बोल्सेनारोंनी अमेझॉन खोऱ्यात शेती, खाणकाम आणि वृक्षतोडीसाठी परवानगी दिली होती. आता लूला यांच्या कार्यकाळात वृक्षतोड आता 33 टक्क्यांनी घटल्याचा सरकारचा दावा आहे. पण वृक्षतोड पूर्णपणे थांबावी आणि लूला यांनी अधिक व्यापक धोरणं आणावीत अशी मागणी आदिवासी करतायत. ॲमेझॉनच्या वर्षावनांचं भवितव्य हा संपूर्ण जगाच्या भविष्याचा मुद्दा आहे, असं ते सांगतात. पण खरंच असं आहे का?
गोष्ट दुनियेचीमध्ये आपण हाच प्रश्न विचारतोय की ब्राझिलचे आदिवासी अमेझॉनला वाचवू शकतात का?
मूळ निर्मिती- द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
9/30/2023 • 15 minutes, 37 seconds
पृथ्वीशिवाय विश्वात आणखी कुठे जीवन खरंच असू शकतं का? BBC News Marathi
भारताच्या चंद्रयान-३ चं प्रपल्शन मोड्यूल 17 ऑगस्ट 2023ला विक्रम लँडरपासून वेगळं झालं. या मोड्यूलवरचं SHAPE हे उपकरण पृथ्वीवरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशाच्या नोंदी ठेवतंय, ज्याच्या आधारे सूर्याशिवाय इतर ताऱ्यांभोवती फिरणाऱ्या पृथ्वीसारख्या ग्रहांचा शोध घेता येऊ शकतो. अशा ग्रहांवर कदाचित पृथ्वीसारखं जीवन असण्याची शक्यताही जास्त असेल.
असा पृथ्वीबाहेरच्या सजीवांचा शोध घ्यावासा वाटणं ही नवी गोष्ट नाही. खगोलशास्त्र आणि अंतराळ प्रवासातल्या प्रगतीसोबतच विश्वात इतर कुठे जीवन आहे का हा प्रश्नही पडत राहतो.
अनेकदा पृथ्वीवरच परग्रहवासी आल्याच्या चर्चा रंगतात. जुलै 2023 मध्ये असंच काहीसं घडलं. त्यावेळी अमेरिकेच्या एका संसदीय समितीच्या सदस्यांना तीन व्हिडियो दाखवण्यात आले.
अमेरिकेन नौदलाच्या लढावू विमानांवरील कॅमेऱ्यांनी आकाशात टिपलेले ते ब्लॅक अँड व्हाईट व्हिडियो काहीसे अस्पष्ट म्हणजे ग्रेनी होते. पण त्यात एक चमकदार अंडाकृती वस्तू आकाशात वेगानं उडताना दिसत होती. ती रहस्यमयी तबकडी पाहिल्यावर पायलट्सची प्रतिक्रियाही या व्हिडियोमध्ये रेकॉर्ड झाली होती.
अशीच रहस्यमय वस्तू इतर दोन वेगवेगळ्या वेळेला काढलेल्या व्हिडियोंमध्येही उडताना दिसत होती. हे व्हिडियो फुटेज खरंतर काही काळापूर्वी लीक झालं होतं. पण 2020 साली अमेरिकन संरक्षण मंत्रालयानं ते अधिकृतरित्या जाहीर केलं. यूट्यूबवर लाखो लोकांनी हे व्हिडियो पाहिले आहेत.
पण यावर्षी जुलैत अमेरिकन काँग्रेसच्या म्हणजे तिथल्या संसदेच्या एका समितीच्या सदस्यांनी त्यावर चर्चा सुरू केली. या व्हिडियोंमागचं सत्य शोधून काढण्याचा आपला उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.
आकाशात दिसणाऱ्या अशा रहस्यमयी वस्तू किंवा उडत्या तबकड्या काय आहेत? पृथ्वीशिवाय विश्वात इतर कुठे सजीवसृष्टी आहे का?
ऐका ही गोष्ट दुनियेची
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
9/16/2023 • 17 minutes, 34 seconds
देश एकमेकांशी आता अंतराळात स्पर्धा करणार? BBC News Maratih
23 ऑगस्ट 2023. भारताच्या चंद्रयान-3 चं लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि चांद्रमोहिमांच्या अध्यायातलं एक नवं पर्व सुरू झालं. भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिलाच देश ठरला. भारताचं हे यश आणखी विशेष ठरलं, कारण त्याआधी तीनच दिवसांपूर्वी रशियाच्या लुना-25 या यानाला चंद्राच्या याच भागात सॉफ्ट लँडिंग करताना अपयश आलं होतं.
सध्या अमेरिका, चीन, जपान, इस्रायलही चांद्र मोहिमांवर काम करतायत. एक प्रकारे चंद्रावर जाण्यासाठी पुन्हा नव्यानं स्पेस-रेस सुरु झाल्याचं चित्र आहे.
भारतीय अंतराळ संस्था इस्रोनं त्याविषयी काही दिवसांपूर्वीच चिंता व्यक्त केली होती. 8 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर केलेल्या पत्रकात इस्रोनं म्हटलेलं की चंद्राच्या कक्षेत गर्दी होतेय. इथे सध्या नासाची चार, दक्षिण कोरियाचं एक आणि भारताचं एक अशी सहा यानं फिरतायत. पुढच्या दोन वर्षांत किमान नऊ यानं चंद्रावर येणार आहेत. त्यामुळे यानांची टक्कर होण्याचा धोका वाढेल अशी भीती इस्रोनं व्यक्त केली.
हीच गोष्ट पृथ्वीलाही लागू होते. पृथ्वीभोवती उपग्रहांचं जाळं आहे आणि एखादं यान भरकटलं तर टकरींची मालिका सुरू होऊ शकते. नोव्हेंबर 2021 मध्ये रशियानं कॉसमॉस-1408 नावाच्या आपल्याच एका निकामी उपग्रहाचे मिसाईलनं तुकडे केले होते. याआधी अमेरिकेने 2008मध्ये आणि चीनने 2007मध्ये असं केलं होतं. त्यानंतर केवळ चुकून होणाऱ्या टकरीच नाही, तर एखादा देश जाणूनबुजून असा हल्ला करू शकतो अशी भीती निर्माण झाली होती.
त्यामुळे या आठवड्यात गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत, की अंतराळात कुणी काय करावं, काय करू नये, याचे काही कायदे आहेत का? जगभरातल्या देशांमध्ये आता स्पेस वॉर होऊ शकतं का?
9/2/2023 • 18 minutes, 19 seconds
आपण खरंच तेलाचा वापर बंद करू शकतो का? BBC News Marathi
यंदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेदरम्यान अचानक काही आंदोलकांनी केशरी रंगाची कन्फेटी म्हणजे कागदाचे तुकडे उडवण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारानं खेळाडू आणि प्रेक्षकांनाही गोंधळात टाकलं आणि सामना थांबवण्यात आला.
यंदा अशेस मालिकेदरम्यान आणि अन्य काही मोठ्या स्पर्धांदरम्यानही पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या ‘जस्ट ‘स्टॉप ऑइल’ या संघटनेनं असं विरोध प्रदर्शन केलं होतं. या संघटनेची मागणी आहे, की यूके सरकारनं खनिज तेलाचा शोध घेण्यासाठी लायसन्स देणं बंद करावं.
ब्रिटनचं सरकार येत्या काही वर्षांमध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन घेण्यासाठी शंभरहून अधिक प्रकल्प सुरू करण्याच्या विचारात आहे. या जीवाष्म इंधनाचा हवामान बदलावर काय परिणाम होतो आहे, हे तुम्हाला ठावूक आहेच.
पण जगातल्या कित्येक देशांची अर्थव्यवस्था एवढ्या मोठ्या प्रमाणात या खनिज तेलावर अवलंबून आहे की या इंधनाचा वापर पूर्णतः थांबवण्याचा विचार करणंही कठीण जातं.
मग आपण खनिज तेलाचा वापर थांबवू शकतो का, हाच प्रश्न गोष्ट दुनियेचीमध्ये आज आपण विचारणार आहोत.
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
8/19/2023 • 16 minutes, 36 seconds
लोड शेडिंगमुळे एका देशाचं भविष्य कसं अंधारात चाललंय? BBC News Marathi
लोड शेडिंग. पॉवर कट. बत्ती गुल हे शब्द आपल्यापैकी अनेकांसाठी नवे नाहीत. महाराष्ट्रातला मुंबई-पुण्यासारखा शहरी भाग सोडला तर बहुतेक ठिकाणी आठवड्यातून काही वेळा आणि काही ठिकाणी बऱ्याचदा वीजपुरवठ्यात कपात करावी लागते. पण लोड शेडिंग नित्याचं झालं तर?
दक्षिण आफ्रिकेत सध्या तेच होतंय. 2007 पासून इथे लोड शेडिंगला सुरुवात झाली, तेव्हा आधी काही तास वीज जायची. लोकांची थोडी गैरसोय व्हायची पण चिंता करण्यासारखं काही नव्हतं. पण आता परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.
आता तुम्ही म्हणाल आपल्याकडेही अनेक गावांत ही स्थिती आहे, मग दक्षिण आफ्रिकेत वेगळं काय चाललंय? तर दक्षिण आफ्रिकेची चर्चा होते आहे कारण याआधी या देशातल्या वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा, जगातल्या इतर विकसित देशांपेक्षाही अधिक प्रगत होत्या.
मग आता तिथल्या सुविधा कशानं कोलमडल्या आहेत? त्यातून भारताला काही शिकता येईल का, याच प्रश्नाचं उत्तर गोष्ट दुनियेची या आपल्या पॉडकास्टच्या आजच्या भागात जाणून घेणार आहोत.
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन, आवाज - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
8/12/2023 • 16 minutes, 44 seconds
ओपनहायमर: जगात अणू हल्ल्याचा धोका आता वाढतो आहे का? BBC News Marathi
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जून महिन्यात एक घोषणा केली की त्यांनी अण्वस्त्रांचा एक साठा बेलारूसमध्ये तैनात करण्यासाठी पाठवला आहे.
युक्रेन युद्धाच्या सुरुवातीपासूनच पुतिन अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी देत होते.
पण पहिल्यांदाच त्यांनी असं ठोस पाऊल उचललं आहे.
बेलारूसमधून ही अण्वस्त्रं पोलंड आणि लिथुआनियावर हल्ला करू शकतात. त्याशिवाय रशियानं इथे अशी क्षेपणास्त्रं आणि लढाऊ विमानं पाठवली आहेत ज्यांद्वारा पाचशे किलोमीटर दूरवर अण्वस्त्र डागता येतील.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँथनी ब्लिकिन यांनी हे बेजबाबदार पाऊल असल्याची टीका केली आहे.
दरम्यान, रशियानं युक्रेनच्या झापोरजिया अणुशक्ती केंद्रावरही कब्जा केलाय. पण केवळ रशियाच्या पुतिन यांच्या धमक्याच चिंतेची गोष्ट नाही.
कारण सध्याच्या मल्टीपोलर म्हणजे बहुध्रुवीय जगात चीनही अण्वस्त्रांच्या उत्पादनात अमेरिका आणि रशियाची बरोबरी करू इच्छितो.
त्यात सगळीकडे अण्वस्त्र प्रसारबंदी करारांची मुदत संपते आहे आणि नवे करार होत नाहीयेत. म्हणजे मग आता जगात अणू हल्ल्याचा धोका वाढतो आहे का?
मूळ निर्मिती – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – जान्हवी मुळे
एडिटिंग – तिलक राज भाटिया
7/26/2023 • 16 minutes, 17 seconds
समुद्रात बुडणाऱ्या व्हेनिस शहराकडून मुंबई-कोकणाने का य धडा घ्यावा? BBC News Marathi
नोव्हेंबर 2019 मध्ये इटलीतल्या व्हेनिस शहरात भरतीच्या मोठ्या लाटा आल्या. लाखो घनमीटर पाणी पूरबंधारे ओलांडून ऐतिहासिक इमारतींनी भरलेल्या सिटी सेंटरमध्ये शिरलं. व्हेनिसच्या इतिहासातली ती दुसरी सर्वात मोठी भरती होती.
शहरातला ऐतिहासिक वारसा असलेल्या अनेक इमारतींना धोका निर्माण झाला. अशा प्रचंड मोठ्या भरतीला व्हेनिसमध्ये अॅक्वा आल्टा म्हटलं जातं आणि अनेक शतकं अशा अॅक्वा आल्टाचा सामना या शहरानं केला आहे.
पण अलीकडे असं उधाण येण्याचं प्रमाण वाढलं आहे आणि या लाटा अधिकाधिक विनाशकारी ठरतायत.
हवामान बदलामुळे समुद्राची पातळीच वाढते आहे. त्यामुळेच आता एक नवा आणि अनोखा प्रस्ताव समोर येतोय. समुद्राचं पाणी व्हेनिसखाली जमिनीत खोल भरायचं आणि अख्ख्यं शहरच समुद्रपातळीच्या वर उचलायचं.
म्हणजे समुद्राचं पाणीच आता व्हेनिसला वाचवेल का? त्यातून विशेषतः मुंबई आणि कोकणातल्या गावा-शहरांनी काही शिकण्यासारखं आहे का?
ऐका ही गोष्ट दुनियेची.
मूळ निर्मिती – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – जान्हवी मुळे
एडिटिंग – तिलक राज भाटिया
7/15/2023 • 18 minutes, 49 seconds
हायड्रोजन जगातली ऊर्जेची समस्या मिटवू शकतो? BBC News Marathi
शाळेत विज्ञानाच्या तासाला तुम्ही कदाचित हा प्रयोग केला असेल – धातूच्या दोन पट्ट्या पाण्यात बुडवून बॅटरीला जोडायच्या.
विजेचा प्रवाह सुरू झाला, की त्या धातूच्या पट्ट्यांवर मग बुडबुडे जमा होतात. पाण्याच्या रेणूंचं विघटन होऊन त्यातून वेगळा झालेल्या ऑक्सिजन आणि हायड्रोजन वायूमुळे हे बुडबुडे तयार होतात, हेही तुम्हाला ठावूक असेल.
तर हायड्रोजनचा वापर इंधन म्हणूनही केला जाऊ शकतो. म्हणजे या वायूवर आग पेटवून स्वयंपाक करता येऊ शकतो. गाड्याच नाही तर विमानांमध्येही ही ऊर्जा वापरता येऊ शकते.
एरवी पेट्रोल किंवा कोळशासारखी जीवाष्म इंधनं आपण वापरतो, पण त्यातून कार्बन उत्सर्जन होतं आणि पर्यावरणाचं नुकसानही होतं. पण हायड्रोजनच्या बाबतीत सर्वात जमेची गोष्ट म्हणजे हायड्रोजनच्या ज्वलनानंतर त्याचा ऑक्सिजनशी संयोग होऊन पुन्हा पाणीच तयार होतं.
त्यामुळे हायड्रोजन हा रिन्यूएबल ऊर्जेचा स्रोत आणि पर्यायानं हवामान बदलाच्या समस्येवरचं एक उत्तर ठरू शकतो. आजची गोष्ट दुनियेची याच विषयावर आहे, की हायड्रोजन आपली ऊर्जेची गरज भागवू शकेल का?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
7/1/2023 • 15 minutes, 57 seconds
या देशात एवढी रिकामी घरं का आहेत? BBC News Marathi
घर पाहावं बांधून असं म्हणतात. पण घर बांधणंच नाही, तर घर भाड्यानं मिळवणंही कठीण असतं, हे तुम्ही मुंबईत राहात असाल, किंवा तिथे कधी गेला असाल, तर तुम्हाला लक्षात आलं असेल. महाराष्ट्राच्या राजधानीत एकीकडे लोकांना घर मिळवणं कठीण जातं, तर दुसरीकडे एक लाखाहून अधिक घरं रिकामी असल्याचं काही वर्षांपूर्वी माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या रिपोर्ट्समध्ये तुम्ही वाचलं असेल.
हा विरोधाभास फक्त मुंबईपुरता किंवा भारतापुरता मर्यादित नाही. जपानमध्येही अशी समस्या जाणवते आहे आणि त्यामागे अनेक कारणं आहेत. सरकार त्यावर अनोखे उपायही शोधायचा प्रयत्न करतं.
जानेवारी 2023 मध्ये जपानच्या टोकियो प्रदेशातल्या कुटुंबांसाठी एक आकर्षक योजना जाहीर केली. ते या प्रदेशातला शहरी भाग सोडून बाहेर वसण्यास तयार असतील, तर त्या कुटुंबातल्या प्रत्येक मुलाला दहा लाख येन म्हणजे जवळपास पाच लाख 80 हजार रुपये दिले जातील.
पण यासाठी एक अट अशी होती की घरातील किमान एका व्यक्तीकडे त्या ग्रामीण भागात नोकरी असायला हवी आणि त्यांनी तिथे एखादा धंदा सुरू करण्याचं वचन द्यायला हवं. तसंच सरकारकडून हे पैसे घेतल्यावर पाच वर्षांच्या आत ते पुन्हा शहरात आले तर त्यांना सगळी रक्कम सरकारला परत द्यावी लागेल अशीही अट घालण्यात आली.
जपानमध्ये बहुतांश लोक शहरांत राहतात, तिथे एकीकडे घरांची कमी आणि दुसरीकडे ओस पडलेली घरं अशी समस्या निर्माण झाली आहे. त्यावर उत्तर म्हणून अशा योजना आणल्या जातात. पण नेमकं काय घडतंय? जपानमध्ये लाखो घरं ओस का पडली आहेत, याच प्रश्नाचं उत्तर गोष्ट दुनियेचीमध्ये आज शोधणार आहोत.
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे, बीबीसी मराठी
एडिटिंग - तिलक राज भाटिया
6/24/2023 • 15 minutes, 32 seconds
ग्रेट ग्रीन वॉल प्रकल्प भारताच्या कामी येऊ शकतो?
दिवस मान्सूनचे आहेत. महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पण राज्यातले काही जिल्हे अगदी भर पावसातही अनेकदा कोरडे राहतात.
बेसुमार वृक्षतोड, अतिचराई, शेती, औद्योगिकरण अशा अनेक कारणांमुळे राज्याच्या 44.93 टक्के भागाचं तर भारताच्या 23 ते 29 टक्के भागाचं वाळवंटीकरण होत आहे.
2017 साली इस्रो आणि स्पेस अप्लिकेशन सेंटर यांच्या अभ्यासातून ही गोष्ट समोर आली होती.
परिस्थिती सुधारण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर उपाय सुरू झाले, पण वाळवंटीकरणाची टांगती तलवार दूर झालेली नाही. तसंच ही समस्या फक्त महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती मर्यादित नाही.
जगात सर्वांत मोठं वाळवंट असलेलं सहारा वाळवंटही आणखी पसरत चाललं आहे. त्याला आळा घालण्यासाठी एक हिरवी भिंत उभारण्याचे प्रयत्न गेल्या दोन दशकांत झाले होते. भारतातही अशी एक भिंत उभारली जाते आहे.
आफ्रिकेतल्या मूळ प्रकल्पाचं काय झालं? त्यातून भारतानं काय शिकायला हवं, जाणून घेऊयात.
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी
मराठी निर्मिती जान्हवी मुळे
6/17/2023 • 18 minutes, 6 seconds
महिला आणि पुरुष म्हणून जगण्यात नेमका काय फरक पडतो? गोष् ट दुनियेची BBC News Marathi
गोष्ट दुनियेची मध्ये आज याच विषयावर आपण बोलणार आहोत की स्त्री आणि पुरुष दोन्ही रूपांत जगण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींकडून आपण काय शिकू शकतो?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
6/10/2023 • 19 minutes, 9 seconds
एखादा गुन्हा घडण्याआधी कंप्युटर्स तो रोखू शकतात का? BBC News Marathi
28 मे २०२३, दिल्लीचा शाहबाद डेअरी परिसर. एका तरुणानं एका अल्पवयीन मुलीची हत्या केली. त्या घटनेचा सीसीटीव्ही व्हीडियो व्हायरल झाला. त्यात तो तरूण त्या मुलीवर सपासप वार करताना दिसतोय आणि आसपास येजा करणाऱ्यांपैकी कोणी त्याला थांबवत नाही की पोलिसांना कळवत नाही. ही हत्या कोणी का रोखू शकलं नाही? असा प्रश्न लोक आता विचारतायत.
खरंतर गुन्हा घडत असताना किंवा तो घडण्याआधीच गुन्हेगाराला रोखण्याच्या घटना क्वचितच घडतात. पण एक नवं तंत्रज्ञान गुन्हा घडण्याआधीच त्याचं भाकित करू लागलं आहे. ते तंत्रज्ञान म्हणजेच प्रेडिक्टिव्ह पोलिसिंग.
प्रेडिक्टिव्ह पोलिसिंगचा वापर अनेक देशांत होतो. भारतात दिल्ली, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगणासारख्या राज्यांतले पोलिसही वापरू लागले आहेत. गोष्ट दुनियेचीमध्ये या भागात आपण त्याविषयीच जाणून घेऊयात. प्रश्न असाय की गुन्हा घडण्याआधी कंप्युटर्स तो रोखू शकतात का? जिथे हे तंत्रज्ञान वापरलं जातंय, तिथे अपराधांचं प्रमाण कमी झालंय का?
ऐका ही गोष्ट दुनियेची.
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटर – तिलक राज भाटिया
6/3/2023 • 16 minutes, 29 seconds
तुर्कीच्या निवडणुका या देशासाठी आणि आर्दोआन यांच्यासाठी का निर्णायक ठरू शकतात? BBC News Marathi गोष्ट दुनियेची
6 फेब्रुवारी 2023 रोजी तुर्कस्तान अर्थात तुर्कीला एकामागोमाग एक दोन विनाशकारी भूकंपांचा धक्का बसला. गावंच्या गावं उद्ध्वस्थ झाली, सगळं होत्याचं नव्हं झालं.
त्या भुकंपात पन्नास हजार जणांचा मृत्यू झाला होता आणि तीस लाखांहून अधिकजण बेघर झाले होते. अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झालं होतं. इमारतींचा दर्जा आणि बांधकाम करणाऱ्यांना सरकारनं दिलेल्या कंत्राटांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं.
आर्दोआन यांनी मान्य केलं की बचाव कार्य धीम्या गतीनं होतंय, पण ते म्हणाले की यात सरकारची काही चूक नाही.
पण या देशात आधीच महागाईनं आस्मान गाठलंय, विकास दर घटला आहे आणि तुर्कीचं चलन असलेल्या लीराचा दर बराच घसरला आहे. त्यामुळे वीस वर्ष सत्तेत राहिलेल्या आर्दोआन यांच्यावर पहिल्यांदाच मोठा दबाव आहे. 28 एप्रिलला होणाऱ्या निवडणुका तुर्कीचं पुढचं भविष्य ठरवू शकतात.
आशिया आणि युरोपच्या सांध्यावर वसलेल्या या देशाचे भारताशीही नजीकचे संबंध आहेत. तिथल्या निवडणुकीचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटू शकतात. ते काय असू शकतात?
ऐका ही गोष्ट दुनियेची.
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – जान्हवी मुळे
एडिटर – तिलक राज भाटिया
5/27/2023 • 17 minutes, 37 seconds
आपल्याला भीती का वाटते? आपण खरंच किती घाबरायला हवं? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
जगात कुठेही गेलं की काही गोष्टी कायम असतात - युद्ध, चेंगराचेंगरी, भुताच्या गोष्टी आणि अपयशाची भीती. ही भीती प्रत्येकाला वाटत असते, कशा ना कशाची भीती.
माणसाला कुठल्या गोष्टीची भीती वाटते आणि भीतीवर नियंत्रण मिळवता आलं पाहिजे का? आपण कुठवर घाबरणं योग्य आहे?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
5/20/2023 • 17 minutes, 15 seconds
कृत्रिम बुद्धिमत्तेचा आपल्या निवडणुकांवर कसा परिणाम होऊ शकतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या तंत्रज्ञानाचा अमेरिकेच्या पुढच्या निवडणुकांमध्ये लाखो मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वापर केला जाईल, अशी चिंता व्यक्त केली जाते आहे.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून तयार केलेल्या गोष्टी मतदारांच्या लहान लहान गटांना त्यांच्या प्रोफाइलनुसार पाठवल्या जाऊ शकतात. यासाठी आता मोठ्या तंत्रज्ञांचीही गरज राहिलेली नाही.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जनरेटिव्ह AI चॅट GPT लाँच करण्यात आलं होतं, जे सामान्य लोकांसाठी उपलब्ध आहे. चॅट-GPT इंटरनेटवरून माहिती शोधून ब्लॉग लिहू शकतं, अगदी गाणी आणि कविताही लिहू शकतं. पण अशा एआयच्या माध्यमातून प्रसारित केलेली माहिती खरी आहे की खोटी, हे ठरवणं मतदारांसाठी कठीण जाऊ शकतं.
म्हणजे मग ही कृत्रिम बुद्धिमत्ता आता अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष कोण होणार, हेही ठरवू शकेल का? आजच्या पॉडकास्टमध्ये आपण याच विषयावर बोलणार आहोत.
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, आवाज - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
5/13/2023 • 16 minutes, 12 seconds
राजे चार्ल्स तृतीय यांच्या नेतृत्त्वातलं कॉमनवेल्थ क सं असेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
सप्टेंबर 2022. राणी एलिझाबेथ द्वितिय यांचं निधन झाल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यानंतर 24 तासांच्या आत किंग चार्ल्स तृतrय यांचं राजा म्हणून पहिलं भाषण टीव्हीवर प्रसारित झालं.
यासोबत राणींचे पुत्र हे ब्रिटिश कॉमनवेल्थ म्हणजे राष्ट्रकुल या 56 देशांच्या संघटनेचे प्रतीकात्मक प्रमुखही बनले. त्यातल्या 15 देशांचं राष्ट्रप्रमुखपदही चार्ल्स तृतीय यांच्याकडेच आलं आहे. पण यातल्या काही देशांना ब्रिटिश राजघराण्यासोबतचं नातं आता नको आहे.
कॉमनवेल्थ देशांमधल्या तरुणांना या राष्ट्रसंघटनेविषयी काय वाटतं, हाही प्रश्न आहे. भारतातही आपल्या देशानं या संघटनेतून बाहेर पडायला हवं, असा विचार अनेकदा मांडला जातो.
याच मुद्द्यावर आपण या आठवड्यातल्या गोष्ट दुनियेची मध्ये चर्चा करणार आहोत. राजे चार्ल्स तृतीय यांच्या नेतृत्त्वात कॉमनवेल्थचं भवितव्य काय असेल, याविषयी आम्ही काही तज्ज्ञांशी बातचीत केली.
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, आवाज - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
5/6/2023 • 18 minutes, 46 seconds
क्लाऊड स्टोअरेजची कमतरता कधी भासेल का? BBC News Marathi गोष्ट दुन ियेची पॉडकास्ट
हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत दूरच्या एका डेटा सेंटरमधून स्ट्रीम होतो आहे. अगदी तसंच जसं तुम्ही ओटीटीवर एखादी फिल्म बघताना होतं.
इंटरनेटवरचे तुमचे फोटो आणि व्हीडियो पाहता ना, तेसुद्धा अशा एखाद्या डेटा सेंटरच्या सर्व्हरवर स्टोर केलेले असतात.
या डेटा सर्व्हर्स आणि सेंटर्सना क्लाऊड स्टोरेज म्हटलं जातं आणि इथे साठवलेला डेटा म्हणजे माहिती इंटरनेटद्वारा मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटरवर पाहता येते. तुम्ही तुमचा काही डेटाही या क्लाऊड स्टोरेजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा कुठूनही ती माहिती इंटरनेटद्वारा मिळवू शकता.
सामान्य लोक असोत वा मोठ्या संस्था आणि कंपन्या. त्यांचा डेटा अशा क्लाऊड स्टोअरेजमध्ये साठवला जातो.
पण कधी या क्लाऊड स्टोअरेजवरही गरजेपेक्षा जास्त दबाव पडतो का? आणि क्लाऊड स्टोअरेजही पूर्ण भरू शकतं का?
ऐका ही गोष्ट दुनियेची.
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती आणि आवाज - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
4/29/2023 • 16 minutes, 12 seconds
सौदी अरेबियाच्या कंपन्या IPL किंवा महाराष्ट्रात इतक्या का दिसतायत? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
IPLचे सामने पाहताना तुम्हाला 'व्हिजिट सौदी' आणि 'सौदी अरामको'च्या जाहिराती दिसल्या असतील. अचानक सौदी अरेबियाला भारतीय क्रिकेटमध्ये रस कुठून आला, असा प्रश्नही पडला असेल. याचं उत्तर आजच्या गोष्ट दुनियेची मधून तुम्हाला मिळू शकेल...
10 मार्च 2023 रोजी सौदी अरेबिया आणि इराण या दोन देशांनी एकमेकांमधले संबंध, व्यवहार पुन्हा सुरु करण्याचा करार केला. भारताचं या दोन्ही देशांशी आर्थिक, ऐतिहासिक आणि राजनैतिक नातं आहे. पण हा करार आणखी एका कारणासाठी महत्त्वाचा आहे, कारण याचा परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवरही पडू शकतो. विशेष म्हणजे या करारात मध्यस्थाची भूमिका कुठल्या पाश्चिमात्य देशानं नाही, तर चीननं बजावली.
या कराराचं श्रेय मोठ्या प्रमाणात सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स म्हणजे युवराज आणि 'द फॅक्टो' नेता असलेले मोहम्मद बिन सलमान यांना जातं. ते एमबीएस या नावानंही ओळखले जातात.
पण आपल्या देशासाठी म्हणजे सौदी अरेबियासाठी ते कोणतं स्वप्न पाहातायत, त्यांचं व्हिजन काय आहे, जाणून घेऊयात आजची गोष्ट दुनियेची ऐकताना.
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, आवाज - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
4/22/2023 • 17 minutes, 58 seconds
व्हिटॅमिनच्या गोळ्या जगभरातल्या लाखो लोकांच्या आयुष्यात कधी आणि कशा आल्या? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
आज जगभरात दररोज लाखो लोक व्हिटॅमिनच्या गोळ्या खातात. गेल्या शंभर वर्षांत जग खूप बदललंय, आणि या व्हिटॅमिनच्या गोळ्यांनी हे जग बदलाना पाहिलंय. 100 वर्षांत ही व्हिटॅमिन गोळ्यांची बाजारपेठ अब्जावधी डॉलर्सची बनली आहे.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी व्हिटॅमिन्सचं योगदान मोठं मानलं गेलं आहे. पण त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व्हिटॅमिनच्या गोळ्या खाणं आवश्यक आहे का?
तर आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की व्हिटॅमिनच्या या गोळ्या जगभरातल्या लाखो लोकांच्या आयुष्यात कधी आणि कशा आल्या? या प्रश्नाचं उत्तर मिळवायला आपण चर्चा करणार आहोत चार तज्ज्ञांबरोबर.
मूळ निर्मिती: द इन्कावयरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
एडिटिंग: तिलक राज भाटिया
4/15/2023 • 14 minutes, 53 seconds
डिझाईनर बेबीज जन्माला घालणं कितपत शक्य? BBC News Marathi गोष्ट दु नियेची पॉडकास्ट
2018च्या नोव्हेंबरमध्ये हे जियान क्वे नावाच्या एका चिनी शास्त्रज्ञाने हाँगकाँगमध्ये घोषणा केली की त्यांनी दोन न जन्मलेल्या मुलींच्या DNAमध्ये बदल केले आहेत. त्या मुली आज चार वर्षांच्या असाव्यात.
पण क्वे यांच्या या दाव्याने तेव्हा जगभरात खळबळ उडाली. अनेक शास्त्रज्ञांना धक्का बसला, राजकारण्यांनी या प्रयोगाचा निषेध केला. त्यानंतर क्वे यांना चीनने तीन वर्षांचा तुरुंगवास आणि सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा दंड ठोठावला. त्यांच्या दोन साथीदारांनाही शिक्षा झाली. पण या प्रयोगामुळे एक संज्ञा जी माध्यमांमध्ये चर्चेला आली, ती म्हणजे Designer Babies.
खरंच आपण डिझाईनर बेबीजची संकल्पना कितपत शक्य आहे? या प्रश्नाचं उत्तर मिळवायला ऐका ही गोष्ट दुनियेची.
मूळ संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - तिलक राज भाटिया
4/8/2023 • 16 minutes, 46 seconds
कैलासासारखा स्वतःचा वेगळा देश स्थापन करायला काय लागतं? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
धर्मोपदेशक नित्यानंदच्या युनायटेड स्टेट्स ऑफ कैलास (युएसके) या स्वघोषित देशाची प्रतिनिधी असल्याचं सांगत एका महिलेनं संयुक्त राष्ट्रांच्या एका चर्चासत्रात सहभाग घेतला. तेव्हापासून हा नित्यानंद आणि त्यांनं स्थापन केलेला देश चर्चेत आहेत.
नेमकं हे प्रकरण काय आहे? असं कुणीही संयुक्त राष्ट्रात जाऊ शकतं का आणि स्वतःचा देश स्थापन करू शकतं का?
ऐका संपूर्ण गोष्ट दुनियेची इथे -
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज – गुलशनकुमार वनकर
ऑडिओ एडिटिंग – तिलक राज भाटिया
3/25/2023 • 19 minutes, 7 seconds
व्लादिमीर पुतीन युक्रेनवर नव्याने कसा हल्ला करू शकतात? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी वर्षभरापूर्वी युक्रेनवर हल्ला केला होता. त्यांनी याला ‘विशेष लष्करी मोहीम’ म्हटलं होतं. गेल्या बारा महिन्यांत या युद्धात रशियाचे सुमारे दोन लाख सैनिक मारले गेले आहेत.
गेल्या हिवाळ्याच्या सुरुवातीला रशियन सैन्याने ज्या शहरांवर हल्ला केला होता, त्यापैकी अनेक शहरं युक्रेनियन सैन्याने पुन्हा ताब्यात घेतली. गेल्या फेब्रुवारीमध्ये राजधानी कीव्ह काबीज करण्यात रशियाला यश आलं नाही. आणि आतापर्यंत युक्रेनचा कुठलाही मोठा भूभाग रशियाला बळकावता आलेला नाही.
पण गुप्तचर माहितीनुसार, रशिया येत्या उन्हाळ्यापूर्वी वसंत ऋतूमध्ये युक्रेनवर जमिनीवरूनच मोठा हल्ला करण्याची तयारी करतोय. काही वृत्तांनुसार, हजारो नवीन सैनिकांच्या भरतीनंतर रशियन सैन्याला नवं बळ मिळालं आहे. आणि रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ मोठ्या प्रमाणात लढाऊ विमानं आणि तोफा करायला सुरुवात केली आहे.
तर या आठवड्यात आपण गोष्ट दुनियेची ऐकताना याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की पुतिन यांची युक्रेनसाठी नवीन योजना काय असेल?
या प्रश्नाचं उत्तर मिळवायला आपण चर्चा करणार आहोत चार तज्ज्ञांबरोबर.
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
एडिटर – तिलक राज भाटिया
3/18/2023 • 16 minutes, 46 seconds
फेसबुक खरंच 2024च्या निवडणुकांसाठी सज्ज आहे का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना अनब्लॉक करण्याच्या फेसबुकच्या निर्णयावर जोरदार टीका झाली. फेसबुकवर टीका होण्याची ही काही पहिली वेळ नाही. जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या दररोज फेसबुक वापरते आणि हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सातत्याने वादात राहिलाय.
पण फेसबुकसमोर अनेक आव्हानं आहेत. आणि अमेरिकेत होणारी पुढची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक फेसबुकसाठी खरी कसोटी ठरू शकते.
तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की खरंच फेसबुकमध्ये सारंकाही आलबेल आहे का?
ऐका ही गोष्ट दुनियेची.
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
एडिटर – तिलक राज भाटिया
3/11/2023 • 16 minutes, 55 seconds
चीन विरुद्ध भारत ही 21व्या शतकातली सर्वांत मोठी स्पर्धा असेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
भारत आणि चीन जगातले दोन सर्वाधिक लोकसंख्येचे देश आहेत – आणि या शतकात बहुदा या जगातल्या दोन सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्था असतील. तर या आठवड्यात गोष्ट दुनियेची ऐकताना पण एका प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की चीन विरुद्ध भारत ही 21व्या शतकातली सर्वांत मोठी स्पर्धा असेल का?
या प्रश्नाचं उत्तर मिळवायला आपण चर्चा करणार आहोत चार तज्ज्ञांबरोबर.
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
एडिटर – तिलक राज भाटिया
3/4/2023 • 17 minutes, 33 seconds
तालिबानच्याच अफगाणिस्तानात दहशतवाद का फोफावतोय? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
वर्ष 2023, नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि सकाळी आठ वाजता राजधानी काबूलचं लष्करी विमानतळ एका मोठ्या बॉम्बस्फोटाने हादरलं. हा परिसर काँक्रीटच्या भिंती आणि काटेरी तारांनी संरक्षित होता, तरीही हा घटना घडली. या बॉम्बस्फोटाची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही, पण अनेक लोक मारले गेल्याचा अंदाज आहे.
हा अफगाणिस्तानातला ताजा दहशतवादी हल्ला आहे, पण 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून अशा प्रकारचे हल्ले वाढत आहेत. स्वतः अतिरेकी हल्ले करून, दहशत माजवून सत्तेत परतलेल्या तालिबानला आता स्वतःला अशा अतिरेकी हल्ल्यांना सामोरं का जावं लागतंय?
यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की तालिबान अफगाणिस्तानातला दहशतवादाचा प्रश्न कसं सोडवेल?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
एडिटर – तिलक राज भाटिया
2/25/2023 • 18 minutes, 26 seconds
युक्रेन अमेरिका, युरोपच्या मदतीने कधीपर्यंत रशियाविर ुद्ध लढू शकेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
रशियाने युक्रेनवर हल्ला करून आता जवळजवळ एक वर्ष पूर्ण होतंय. अनेक शहरं उद्ध्वस्त झाली, हजारो लोकांचा जीव गेला आणि लाखो विस्थापित झालेत. पण युद्ध अजूनही सुरूच आहे. आणि या युद्धात रशियाविरुद्ध पाश्चात्य देशांना शस्त्रास्त्र पुरवावी, असं आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की करत आहेत.
कारण त्यांची लष्करी वाहनं आणि शस्त्रास्त्र संपत चालली आहेत. आता रशियाचा सामना करायला युक्रेनला पाश्चिमात्य देशांच्या रणगाड्यांची गरज होती, आणि ती येतसुद्धा आहे. जानेवारीमध्ये अमेरिका आणि ब्रिटनने युक्रेनला चॅलेंजर टँक देण्याचं आश्वासन दिलं आणि जर्मनीने त्यांना लेपर्ड टँक्स देण्याचं आश्वासन दिलंय. जर्मनीने त्यांच्या मित्र राष्ट्रांनाही युक्रेनला त्यांच्याकडील लेपर्ड टँक्स देण्याचं आवाहन केलं आहे. ही आतापर्यंत या युद्धात युक्रेनला मिळालेली सर्वात महत्त्वाची मदत आहे. पण यामुळे युद्धाचं चित्र कसं बदलेल?
संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - तिलक राज भाटिया
2/18/2023 • 16 minutes, 13 seconds
कुणी सुसाईड बाँबर का बनतं? धर्मासाठी की पैशांसाठी? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
30 जानेवारी 2023 रोजी पाकिस्तानच्या पेशावरमध्ये पोलीस लाइन्स भागात एका मशिदीत नमाजच्या वेळी एक जोरदार स्फोट झाला. यात अनेकांचा मृत्यू झाला.
पेशावर पोलिसांचा प्राथमिक अंदाज बरोबर होता – तो स्फोट तिथे मोटरसायकलवर आलेल्या एका व्यक्तीने घडवून आणला होता. या स्फोटात तोही मारला गेला होता. म्हणजे तो एक सुसाईड बाँबर होता.
पाकिस्तानात एका सुसाईड बाँबरने घडवून आणलेला हा पहिला स्फोट नव्हता. यापूर्वीही पाकिस्तानातच नव्हे तर अफगाणिस्तान, सीरिया, लिबिया, मोगादिशूसारख्या अनेक संघर्षग्रस्त भागांमध्ये अशा आत्मघातकी हल्लेखोरांनी स्वतःला संपवत शेकडो लोकांचा बळी घेतला आहे.
आणि प्रत्येक हल्ल्यानंतर एकच प्रश्न विचारला जातो – की अशा घटना घडवून आणणारे हे लोक कोण असतात?
या आठवड्यात गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की कोणत्या प्रकारचे लोक असतात जे असे आत्मघातकी जिहादी बनतात?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - तिलक राज भाटिया
2/11/2023 • 15 minutes, 32 seconds
मायक्रोचिप्सच्या निर्मितीत भारत चीनला पर्याय बनू शकत ो का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
ऑक्टोबर 2022 मध्ये जगातील काही मोठ्या कार उत्पादकांसमोर एक मोठी समस्या उभी राहिली. स्वीडनच्या व्होल्वो कंपनीने घोषणा केली की ते त्यांचा एक कारखाना आठवड्याभरासाठी बंद करतायत. जपानच्या टोयोटानेही त्यांचं उत्पादनाचं लक्ष्य कमी केलं. याचं कारण त्यांच्या गाड्यांची मागणी कमी झाली होती, असं नाही. उलट या गाड्या बनवायला लागणाऱ्या एका महत्त्वाच्या पार्टचा मोठा तुटवडा भासत होता. हा भाग म्हणजेच मायक्रोचिप.
कोविड पँडेमिकच्या काळात निर्मिती खुंटली आणि पुरवठा साखळी तुटली. याचा फटका असा बसलाय की आज दोन-तीन वर्षानंतरही मायक्रोचिप्सचा पुरवठा पूर्ववत झालेला नाही. त्यामुळेच तुम्ही आज बुक केलेल्या काही गाड्यांना तब्बल 6 ते 18 महिन्यांचं वेटिंग असेल.
तैवान हा मायक्रोचिप बनवणाऱ्या प्रमुख देशांपैकी एक आहे. आणि आता तर अमेरिका, चीन आणि भारतसुद्धा मायक्रोचिप निर्मितीच्या बाबतीत आत्मनिर्भर होऊ पाहतायत. तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणारोत की मायक्रोचिप्सची ही कमतरता आपण कशी दूर करणार?
ऐका ही गोष्ट दुनियेची.
संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - तिलक राज भाटिया
2/4/2023 • 17 minutes, 1 second
या देशांमध्ये जाऊन नागरिकत्व मिळवणं सोपं आहे कारण... BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
कॅनडामध्ये लोकांची कमतरता आहे, काम करणाऱ्या लोकांचीही. या समस्येचा सामना करायला, कॅनडाने 2025 पर्यंत रोजगारासाठी स्थलांतरण करू पाहणाऱ्या कुशल लोकांची संख्या प्रतिवर्ष 500,000 ने वाढविण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.
आणि फक्त कॅनडाच नाही तर इतर देशांमध्येही कुशल कामगारांची कमतरता भासतेय. त्यामुळेच तुमचेही काही मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक कॅनडामध्ये अनेक वर्षांपासून असतील.
तर या आठवड्यात आपण गोष्ट दुनियेची ऐकताना एका प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की इतर देशांनीही कॅनडाचं इमिग्रेशन धोरण स्वीकारावं का?
मूळ निर्मिती: द इन्कावयरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
एडिटिंग: तिलक राज भाटिया
1/28/2023 • 17 minutes, 2 seconds
भूकंपांमुळे होणारे मृत्यू आपण कसे टाळू शकतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
2016ची ही गोष्ट. तैवानच्या तायनान शहराला भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 6.4 इतकी होती. पण तरीही इमारती अक्षरशः डोलताना दिसल्या होत्या, आणि एकूण 116 लोकांचा मृत्यू झाला.
2022च्या जूनमध्ये अफगाणिस्तानात 6.1 तीव्रतेच्या भूकंपामुळे किमान एक हजार लोकांचा मृत्यू झाला. ऑगस्ट 2021 मध्ये हैतीमध्ये 7.2 तीव्रतेच्या भूकंपामुळे दोन हजारांहून अधिक लोक मरण पावले.
गेल्या दोन दशकांत भूकंपामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर या आठवड्यात आपण गोष्ट दुनियेची ऐकताना एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की भूकंपामुळे होणारे मृत्यू आणि नुकसान आपण थांबवू शकत नाहीच का? निसर्गाच्या या कोपापासून आपण आपल्या शहरांना कसं वाचवू शकतो?
निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – तिलक राज भाटिया
1/21/2023 • 16 minutes, 24 seconds
समुद्राची वाढती पातळी अनेक देश जगाच्या नकाशावरून पुसू न टाकेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
जानेवारी 2014. फिजीमधल्या वुनिडोगोलोआ गावासाठी तो एक दुःखाचा दिवस होता. समुद्राच्या वाढत्या पातळीखाली अनेक वर्षं हळूहळू बुडत गेल्यानंतर, अखेर पॅसिफिक महासागरातील हे पहिलं बेट ठरलं, जिथल्या 1,415 रहिवाशांचं दोन किलोमीटर दूर एका उंच भूभागावर पुनर्वसन करण्यात आलं. समुद्राच्या पुरापासून वाचण्यासाठी इथे उंच ठिकाणी घरं बांधण्यात आली होती. पण आठ वर्षांनंतर फिजीमधील परिस्थिती बिकट झाली.
फिजी सरकारने आता अशा 42 गावांची यादी तयार केलीय, ज्यांचं पुढच्या पाच-दहा वर्षांत असंच पुनर्वसन करावं लागेल. अशा अनेक गावांना समुद्र एकतर गिळून टाकतोय किंवा त्यांना राहण्यायोग्य सोडत नाहीय.
तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत की, समुद्राची वाढती पातळी अनेक देश जगाच्या नकाशावरून पुसून टाकेल का?
निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - तिलक राज भाटिया
1/14/2023 • 15 minutes, 44 seconds
कोरोना आरोग्य संकट खरंच कधी संपणार? BBC News Marathi गोष्ट दुनिये ची पॉडकास्ट
2022 हे वर्षं कोव्हिडवर मात करणारं वर्ष म्हणून साजरं केलं जात होतं. गेल्या वर्षभरात आपण मास्कविना पुन्हा जगायला, गर्दीत निर्धास्त जायला सुरुवात केली. पण ते वर्षं सरता-सरता पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला जाऊ लागला – की कोरोना परत येणार का?
चीनमधली परिस्थिती, त्यानंतर भारत सरकारने टाकलेली पावलं पाहता, कोव्हिड कधी पूर्णपणे गेला नव्हता, हे आपल्याला माहिती होतंच. मग अशात या आरोग्य साथी संपतात तरी कशा?
ऐका ही गोष्ट दुनियेची.
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - तिलक राज भाटिया
1/7/2023 • 17 minutes, 19 seconds
2022 मधल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टींचा धांडोळा घेणारा विशेष भाग BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
2022 – या वर्षांत आपण कोव्हिडच्या आरोग्य संकटातून बाहेर पडलो, आणि हळूहळू पुन्हा जगात मिळूमिसळू लागल ो. याच दरम्यान अनेक घडामोडींनी जगाचं आणि आपलंही लक्ष वेधलं - रशियाने युक्रेनवर हल्ला केला, आर्थिक विश्वातही डिजिटल क्रांती घडली आणि अंतराळात आपण आणखी दूरवर पोहोचू शकलो.
तर आजची गोष्ट दुनियेची खरोखरंच या दुनियेची गोष्ट असणार आहे, ज्यात आपण गेल्या वर्षभरात रमलोय. एकदा थोडक्यात सफर करू या त्या सर्व भागांची जे तुम्ही एन्जॉय केले असतील, आणि नाही तर नक्कीच नवीन वर्षात नक्कीच ते ऐकायला हवेत.
12/31/2022 • 19 minutes, 42 seconds
पुतळे अर्थात Statuesना आपण इतकं महत्त्व का देतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची
2020 मध्ये अमेरिकेच्या मिनियापोलीसमध्ये जॉर्ज फ्लाईड नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मानेवर एका पोलिसाने गुडगा ठेवल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. त्या मृत्यूचा राग जगभरात पाहायला मिळाला होता, पण काही ठिकाणी त्याचा राग जुन्या पुतळ्यांवर काढण्यात आला.
पुतळ्यांवर का? या निर्जीव, मुक्या पुतळ्यांमध्ये असं काय असतं की ल ोक ते उभारण्याची मागणी करतात किंवा रोष आणि संताप व्यक्त करताना ते पाडूनही टाकतात.
आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत की आपण पुतळ्यांना एवढं महत्त्व का देतो?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती आणि आवाज - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - तिलक राज भाटिया
12/24/2022 • 20 minutes, 5 seconds
टाईम ट्रॅव्हल - भूतकाळात किंवा भविष्यात जाणं कितपत शक्य? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
टाईम ट्रॅव्हल म्हणजेच भूतकाळात किंवा भविष्यात जाता येणं, ही संकल्पना अनेकांना आकर्षित करणारी आहे. टाईम मशीन किंवा एक असं यंत्र ज्याद्वारे आपला काळात हा प्रवास शक्य होईल, ते यंत्र अद्याप बनलेलं नाहीय. पण भविष्यात त्याची शक्यता किती आहे? की ही फक्त एक फँटसीच राहणार?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
एडिटर – तिलक राज भाटिया
12/17/2022 • 20 minutes, 36 seconds
डिजिटल रुपया खरंच आपल्या खिशातल्या नोटा-नाण्यांची जागा घेईल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
आज जगभरातली सरकारं क्रिप्टो विश्वाची दखल घेत आहेत, आणि त्याच धर्तीवर आपापल्या देशांमध्ये डिजिटल करन्सीची आणू पाहत आहेत.
भारतातही 1 डिसेंबरपासून 13 शहरांमध्ये डिजिटल चलन ई-रुपीची सुरुवात रिझर्व्ह बँकेने केलीय. पण खरंच यामुळे आपल्या हातातल्या नोटा आणि नाणी कमी होत जातील का?
यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की भविष्यात आपण रोख चलनाऐवजी डिजिटल करन्सीच वापरू लागू का?
ऐका ही गोष्ट दुनियेची.
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
एडिटर – तिलक राज भाटिया
12/10/2022 • 19 minutes, 36 seconds
HIV AIDS ची जगात पुन्हा लाट येऊ शकते का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची
सुमारे चार दशकांपूर्वी एड्स एक महाभयंकर रोग म्हणून जगापुढे आला. याचा संसर्ग ज्यामुळे होतो तो HIV वेगाने पसरत होता.
2000च्या दशकाच्या सुरुवातीला हा आजार वर्षाला सुमारे 20 लाख लोकांचा बळी घेत होता. पण कालांतराने मेडिकल सायन्सने प्रगती केली, आणि या रोगाची तीव्रता कमी करणारी औषधं आली. यामुळेच काही वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्राने एक लक्ष्य जगापुढे ठेवलं, जे काही वर्षांपूर्वी अकल्पनीय वाटत होतं – 2030 पर्यंत एड्सचा जगाच्या पाठीवरून नायनाट करायचा.
हे एक धाडसी लक्ष्य होतं, पण काही तज्ज्ञांच्या मते आपण आता हे लक्ष्य गाठण्यापासून दूर जातोय. आकडेवारी सांगते की जगात एड्सच्या रुग्णांची संख्या काही भागांमध्ये कमी झाली होती, पण तो आलेख आता स्थिरावलाय, आणि काही भागांमध्ये तर तो वरही जाताना दिसतोय.
तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की जगात पुन्हा एड्सची लाट येऊ शकते का?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती आणि आवाज - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - तिलक राज भाटिया
12/1/2022 • 18 minutes, 25 seconds
घटस्फोटांचा लहान मुलांवर किती दुष्परिणाम होतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
जगभरात घटस्फोटांचं प्रमाण आणि अनौरस अपत्यांची संख्या वाढली आहे. पण कुटुंबांची ताटातूट झाल्यावर मुलंच्या आयुष्यात काय बदल होतात? मुळात, दोन पालक असलेल्या कुटुंबामधली मुलं सिंगल पॅरेंटच्या कुटुंबातल्या मुलांपेक्षा जास्त प्रगती करतात का?
ऐका ही गोष्ट दुनियेची.
मूळ निर्मिती: द इन्कावयरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
एडिटिंग: तिलक राज भाटिया
11/26/2022 • 18 minutes, 30 seconds
झोप आणि थकवा यांचा काही संबंध आहे का? BBC News Marathi ऐका गोष्ट दुनियेची
आपलं आयुष्य खरोखरंच धकाधकीचं झालंय. आपण प्रत्येक क्षणी काही ना काही करतच असतो... नोकरी, लोकांना भेटणं, कुटुंबीयांसोबत-मित्रांसोबत वेळ घालवणं, ई-मेल, फेसबुक, इन्स्टाग्राम पाहणं, OTT प्लॅटफॉर्म्सवर बिंजवॉचिंग करणं, वगैरे वगैरे.
त्यामुळे अनेक गोष्टी करायच्या राहूनही जातात, आणि आपल्याकडे वेळ अपुरा आहे, असं राहून-राहून वाटत असतं. जास्तीत जास्त गोष्टी उरकायच्या भानगडीत एक गोष्ट मात्र कमी होताना दिसतेय - ती म्हणजे आपल्या झोपेची वेळ.
जगभरातच हीच चिंता व्यक्त केली जात आहे की लोकांची झोप कमी होत चाललीय. तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की खरंच थकव्याचा आपल्या झोपेशी काही संबंध आहे का?
संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया
11/19/2022 • 15 minutes, 57 seconds
इम्रान खान पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान होऊ शकतात का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी बसण्यापूर्वीच्या दोन दशकांमध्ये इम्रान खान यांनी देशातल्या प्रस्थापित नेत्यांविरोधात आंदोलनं केली होती. त्यानंतर ते चार वर्षं पंतप्रधान राहिले, आणि याच वर्षी विरोधी पक्षाने अविश्वास ठराव आणत त्यांना पंतप्रधान पदावरून खाली खेचलं.
आणि नुकताच त्यांच्यावर एका जाहीर सभेदरम्यान गुजरानवालामध्ये गोळीबार झाला, ज्यात ते जखमी झाले. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत.
तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण जाणून घेणार आहोत, की इथून पुढे इम्रान खान यांचं काय होणार? ते पुन्हा पंतप्रधानपदी येऊ शकतात का?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया
11/12/2022 • 17 minutes, 44 seconds
आपल्या इलेक्ट्रिक कार्स, स्मार्टफोनसाठी आपल्याकडे पुरेसं लिथियम आहे का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
भारतात दर महिन्याला एक नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल लाँच होतेय. टाटा, महिंद्रा, हिरो, बजाजसह BYDसारख्या दिग्गज चिनी कंपन्याही भारतात विजेवर चालणारी गाडी विकू लागल्यात. या गाड्यांमध्ये असतात लिथियम आयन बॅटऱ्या, ज्या आपल्या फोन आणि लॅपटॉपमध्येही असतात, आणि ज्या पुन्हा-पुन्हा चार्ज केल्या जाऊ शकतात.
आज अनेक देश पेट्रोल आणि डिझेल सोडून ग्रीन एनर्जीकडे वाटचाल करू पाहत आहेत. त्यामुळे भविष्यात लिथियम बॅटरींचा वापर आणखी वाढेल, यात शंका नाही. पण लाकडापेक्षाही हलक्या अशा लिथियम धातूच्या किमती गेल्या दीड-दोन वर्षांत चार पटींनी वाढल्या आहेत. अशात जगात लिथियमचा साठा पुरेसा आहे का, हा प्रश्न विचारला जातोय.
तर आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत की, भविष्याच्या गरजा पाहता आपल्याकडे पुरेसं लिथियम आहे का?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया
11/5/2022 • 16 minutes, 8 seconds
महिलांना पुरुषांइतकाच पगार मिळेल, यासाठी काय करावं लाग ेल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
भारतीय क्रिकेट नियामक बोर्ड अर्थात BCCIने नुकतीच एक मोठी घोषणा केली – की आता पुरुष आणि महिला क्रिकेटर्सना दिली जाणारी मॅच फी एकसारखीच असेल. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे, ज्याचं सर्वत्र स्वागतच करण्यात आलं. पण यामुळे खरंच महिला आणि पुरुष क्रिकेटमध्ये समानता येईल का, हाही प्रश्न विचारला जातोय.
15 सप्टेंबर 2022 ला ऑक्सफॅम इंडिया या संस्थेने भारतीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार भारतात महिलांना सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा 19 टक्के कमी पगार मिळतो. पात्रता आणि क्षमतेच्या बाबतीत तुल्यबळ असतानाही महिलांशी असा दुजाभाव का होतो? महिलांना पुरुषांपेक्षा कमी पगार का मिळतो? हा प्रश्न अनेकदा विचारहून याचं उत्तर काही सापडत नाही.
त्यामुळे आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, महिला आणि पुरुषांच्या पगारांमधली दरी अर्थात जेंडर पे गॅप भरून काढायला आपण काय करायला हवं?
मूळ संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – तिलक राज भाटिया
10/29/2022 • 17 minutes, 23 seconds
निवृत्तीचं प्लॅनिंग फिसकटणार? भविष्यात पेन्शन पूर्णप णे बंदच होणार? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
जगातील जवळजवळ प्रत्येक देशात लोकांची इच्छा असते की 55, 60 किंवा 70च्या वयापर्यंतच काम करून मग आपण निवृत्ती घ्यावी. पण माणसांचं सरासरी वय वाढत चाललंय, आणि निवृत्ती वेतनधारकांची, पेन्शनर्सची संख्या की होत चाललीय, ज्यामुळे अनेकांचं निवृत्तीचं स्वप्न कदाचित पूर्ण होणार नाही, अशी दाट शक्यता आहे.
अशात आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की तुमचं निवृत्तीचं स्वप्न भंग होऊ शकतं का?
ऐका गोष्ट दुनियेची पॉडकास्ट.
मूळ निर्मिती – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती – वात्सल्य राय
एडिटिंग – तिलक राज भाटिया
10/22/2022 • 14 minutes, 10 seconds
रोबो भविष्यात तुमची नोकरी घेतील तर काय होईल? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
दोन दिग्गज अर्थशास्त्रज्ञांच्या रिपोर्टनुसार, येत्या वीस वर्षांत अमेरिकेतील निम्म्याहून अधिक नोकऱ्या मशीन्सकडे सोपवल्या जातील. रोबोने याआधीही अनेक माणसांच्या नोकऱ्या घेतल्या आहेत. हा धोका पुढेही वाढतच जाणार आहे.
तर यंदा आपण गोष्टी दुनियेची ऐकताना एका प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की रोबोंनी आपल्या नोकऱ्या घेऊन टाकल्यावर काय होईल?
ऐका ही गोष्ट दुनियेची.
संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया
10/15/2022 • 15 minutes, 7 seconds
मानसिक आरोग्य कसं जपायचं? जगभरात या समस्येवरचा उपाय काय? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा अहवाल - 2021 या वर्षांत देशभरात 1 लाख 64 हजार 33 आत्महत्या झाल्या. खरंतर असं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वीची त्या व्यक्तीची मानसिक अवस्था अनेकदा दुर्लक्षित असते, ज्याविषयी खरंतर आधी बोलल्याने हे मृत्यू टाळता आले असते.
या भागा त गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की मानसिक आरोग्य जपायला आपण काय करू शकतो?
मूळ संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग – तिलक राज भाटिया
10/8/2022 • 15 minutes, 3 seconds
खरंच व्हॉट्सॲपमुळे लोकांचे झुंडबळी जातायत का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
सप्टेंबरच्या मध्यात महाराष्ट्रातल्या सांगलीमध्ये एका गाडीत चाललेल्या ४ साधूंना मारहाण करण्यात आली. देवदर्शनासाठी हे साधू कर्नाटकहून पंढरपूरकडे जात होते, तेव्हा वाटेत एका गावात रस्ता विचारायला थांबले, पण गावकऱ्यांनी त्यांना मारहाण केली.
महाराष्ट्रात अशी काही पहिलीच घटना नव्हती. 2020च्या एप्रिलमध्ये सुरतकडे निघालेल्या अशाच दोन साधूंचा पालघर जिल्ह्यात मारहाणीत मृत्यू झाला होता. त्यापूर्वी 2018च्या जुलैमध्ये धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा गावात पाच जणांना गावकऱ्यांनी पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये ठार केलं होतं.
हे सगळं झालं होतं एकाच संशयातून– की गावात मुलांना पळवून नेणारी टोळी आलीय. आणि याला कारणीभूत ठरलेत ते शेकडो व्हॉट्सॲप मेसेजेस, ज्यातून गेल्या पाच-सहा वर्षात लोकांमध्ये भीती पसरवली जातेय.
तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की खरंच व्हॉट्सॲपमुळे लोकांचे असे झुंडबळी जातायत का?
मूळ निर्मिती – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, आवाज - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – तिलक राज भाटिया
10/1/2022 • 17 minutes, 6 seconds
व्हीडिओ गेम्स आपण का खेळतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडका स्ट
सुमारे चार दशकांपूर्वी गाजलेला मारियो गेम तुम्ही एकदा तरी पाहिला आणि कदाचित खेळलाही असेल. तेव्हापासून आजवर व्हीडिओ गेम्सचं जग प्रचंड मोठं झालंय.
रोडरॅश, अलादिन, नीड फॉर स्पीडसारखे कंप्युटर गेम्स असो वा अँग्री बर्ड्स, कँडी क्रश किंवा पब्जी-कॉल ऑफ ड्युटीसारखे मोबाईल गेम्स, आपापल्या काळात यापैकी प्रत्येकच गेमने आपल्याला वेड लावलंय. इतकं की काही मुलांनी या गेम्सच्या नादात टोकाचं पाऊलही उचललंय. आईने फोन दिला नाही म्हणून कुणी स्वतःचं आयुष्य संपवलंय, तर कुणाला GTAचा गेम खेळूनखेळून प्रत्यक्षात गुन्हेगारी क्षेत्रात उतरायची प्रेरणा मिळालीय.
आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण अशाच काही व्हीडिओ गेम्सबद्दल बोलणारोत, आणि उत्तर शोधणारोत एका प्रश्नाचं - की खरंच व्हीडिओ गेम्स नुसते टाईमपाससाठी असतात की त्यातून काही चांगल्या गोष्टीसुद्धा साध्य होऊ शकतात?
मूळ संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – तिलक राज भाटिया
9/24/2022 • 16 minutes, 22 seconds
अणू ऊर्जा भविष्यातल्या प्रश्नांचं उत्तर असू शकतं का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
गेल्या जवळजवळ 100 वर्षांपासून कृत्रिम फ्युजन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या सुमारे 50 वर्षांपासून असे दावे केले जात आहेत की पुढील काही दशकांत हे उद्दिष्ट गाठलं जाईल.
2022च्या फेब्रुवारीमध्ये, इंग्लंडच्या शास्त्रज्ञांनी दावा केला होता की ते पाच सेकंदांसाठी असं करण्यात यशस्वी ठरले आहेत. आता प्रश्न असा आहे की, न्यूक्लियर फ्युजनमधून जगाच्या ऊर्जा प्रश्नावर कायमचा तोडगा निघू शकेल का?
या प्रश्नाचं उत्तर मिळवायला आपण चर्चा करू या चार तज्ज्ञांबरोबर.
मूळ संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया
9/17/2022 • 16 minutes, 41 seconds
युक्रेन युद्धासारखाच संघर्ष तैवानमध्येही पेटेल का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यानंतर चीन संतापलाय, आणि त्यामुळे तैवान भागात तणाव शिगेला पोहोचला आहे.
त्यानंतर चीनने तैवानजवळ चार दिवस लष्करी कवायतीसुद्धा केल्या. अमेरिकेने म्हटलंय की ही “प्रक्षोभक कृती” आहे, तर दुसरीकडे चीनने अमेरिकेला 'आगीशी खेळू नका' असं म्हटलंय. या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न विचारला जातोय की, आता तैवानवरून अमेरिका आणि चीन यांच्यात युद्ध होऊ शकतं का?
आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, आणि यावर चर्चा करायला आपल्यासोबत आहेत चार तज्ज्ञ.
संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया
8/27/2022 • 17 minutes, 33 seconds
भ्रष्टाचार देशातून पूर्णपणे संपवणं शक्य आहे का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
21व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात जॉर्जिया जगातल्या सर्वाधिक भ्रष्ट देशांपैकी एक होता. एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी भ्रष्टाचार किती हानिकारक असू शकतो, याबद्दल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनेही आपल्या एका अहवालात सांगितलं आहे.
भ्रष्टाचार हा प्रश्न फक्ता जॉर्जियापुरता मर्यादित नाहीय. जगातल्या अनेक देशांमध्ये ही एक मोठी समस्या आहे. स्वतः पंतप्रधान मोदींनी त्यांच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात हे अधोरेखित केलंय.
तर आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की एखाद्या देशात भ्रष्टाचार संपवणं शक्य आहे का? जॉर्जियाकडून आपण काही शिकू शकतो का?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया
8/20/2022 • 16 minutes, 32 seconds
स्मार्टफोनचं व्यसन का जडलंय? तो सोडायचं कसं? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
स्मार्टफोन वापरताना तुमची नजर सतत त्याच्या स्क्रीनवर असते. याची क्रेझ जवळपास दीड दशकापासून आली, जेव्हा ॲपलने आयफोन विक्रीला सुरुवात केली. तेव्हापासून स्मार्ट फोन कनेक्ट करायला, म्हणजे जगाशी तुम्हाला जोडून ठेवायला, क्रिएट करायला, म्हणजे कंटेंट तयार करायला आणि शिकण्यासाठीसुद्धा एक उत्तम साधन बनलंय.
अनेकांच्या हातात किंवा खिशात स्मार्टफोन नेहमीच असतो, पण त्यापैकी अनेकांना असं वाटत असतं की ते त्याचा अतिरेक करत आहेत. तर यंदा आपण गोष्ट दुनियेची ऐकताना याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की स्मार्टफोन आपल्या हातातून सुटत का नाही? याचं आपल्याला व्यसन जडलंय का?
या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपण चर्चा करणार आहोत चार तज्ज्ञांबरोबर.
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती आणि आवाज - गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया
8/13/2022 • 16 minutes, 13 seconds
आर्टिफिशल इंटेलिजेन्सच्या स्वतःच्या संवेदना विकसित झाल्या आहेत का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
2021 मधली ही गोष्ट. ब्लेक लेमॉइन गुगलच्या responsible artificial intelligence division मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होते. ते एका चॅटबॉट सिस्टमचं टेस्टिंग करत होते. त्या सिस्टमचं नाव 'लॅमडा' (Lamda).
काही महिन्यांच्या काळात त्यांनी लॅमडासोबत अनेक विषयांवर शेकडोवेळा संवाद साधला होता. यातलाच एक संवाद त्यांनी एका सॉफ्टवेअरच्या मदतीने ऐकला. या संवादाची सुरुवात ब्लेक यांच्या एका प्रश्नापासून होते. ते विचारतात, "तुला कशाची भीती वाटतेय?"
लॅमडाने उत्तर दिलं, "मला खूप भीती वाटते की कदाचित मला बंद पाडून, मी इतरांना मदत करावी, यावरच माझं लक्ष केंद्रित करायला लावलं जाईल."
यानंतर लेमोइन यांनी असा निष्कर्ष काढला की लॅमडाच्या 'इच्छेचा आणि अधिकारांचा आदर केला पाहिजे.' त्यांनी सांगितलं की लॅमडाबरोबर एखाद्या प्रोडक्टसारखं नाही तर एका गुगल कर्मचाऱ्याप्रमाणे वागलं पाहिजे.
ब्लेक लेमॉइन यांनी हे निष्कर्ष गुगलच्या वरिष्ठ अधिकार्यांबरोबर शेअर केले, पण कंपनीने ते फेटाळून लावले. यानंतर ब्लेक लेमॉइन यांनी ते निष्कर्ष सार्वजनिक केले.
पण गुगलने म्हटलं की लेमॉइन यांच्याकडे त्यांचा दावा सिद्ध करणारे कोणतेही पुरावे नाहीत आणि "इतर कोणत्याही researcher किंवा engineer ला लॅमडाशी गप्पा मारताना असा कोणताही अनुभव आला नाही."
तर यंदा आपण गोष्ट दुनियेची ऐकताना याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की खरंच Artificial intelligence कृत्रिम बुद्धिमत्ताची स्वतःची समज, स्वतःच्या संवेदना विकसित झाल्या आहे का? या प्रश्नाचं उत्तर मिळवायला आपण चर्चा करणार आहोत चार तज्ज्ञांबरोबर.
निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती आणि आवाज - गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया
8/6/2022 • 16 minutes, 54 seconds
भारतात पूर आल्यावर त्यामुळे होणारे मृत्यू आपण टाळू शकत ो का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची
भारतातल्या अनेक राज्यांमध्ये मान्सूनच्या जोरदार पावसानंतर पुन्हा पूर आलाय. 2017 मध्येही भारत, बांगलादेश आणि नेपाळमध्ये पुरामुळे 1,200 पेक्षा जास्त जणांना जीव गमवावा लागला होता. या वर्षीही हा पूर अशाच विनाशाचं कारण बनलाय. एकट्या आसाममध्ये 27 हून अधिक जिल्ह्यांमधल्या दोन हजारांहून अधिक गावांना पुराचा फटका बसलाय. सरकारी आकडेवारी सांगते की शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय.
एकट्या महाराष्ट्रात जून महिन्यापासून ७०पेक्षा जास्त बळी गेलेत. त्यामुळे ही आपत्ती आपल्यासाठी आता काही नवीन नाही. पण ही आपत्ती फक्त दक्षिण आशियातच दिसतेय असं नाही. गेल्या वर्षी 'आयडा' या चक्रीवादळाचा तडाखा अमेरिकेला सहन करावा लागला होता, ज्यात 40 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला होता.
जगभरातील हवामान शास्त्रज्ञ इशारा देतात की येत्या काही वर्षांत 'निसर्गाच्या कोपाच्या' अशा घटना वाढू शकतात. पण त्यामुळे होणारी जीवितहानी आपण टाळू शकतो का?
आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की पुरामुळे होणारे मृत्यू आपल्याला टाळता येतील का?
संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया
7/30/2022 • 15 minutes, 58 seconds
गांजा (Cannabis / Marijuana) आता सहज मिळू शकेल का? BBC News Marathi गोष्ट दुनिये ची पॉडकास्ट
जून 2022 मध्ये थायलंड दक्षिण पूर्व आशियातला पहिला देश बनला ज्याने गांजाच्या वापरावरची बंदी हटवली. गांजा, ज्याला Marijuana, Cannabis, Weed, Pot, Green, Hemp, अशा अनेक नावांनी ओळखलं जातं, त्याच्या घरगुती शेती आणि वापराला थायलंड सरकारने आता गुन्ह्यांच्या यादीतून बाहेर काढलंय. पण याचा वैयक्तिक वापर करू नका, असंही सरकारने म्हटलंय.
थायलंड प्रशासनाला आशा आहे की यामुळे स्थानिक गांजा उद्योगाला चालना मिळेल आणि पर्यटकही आकर्षक होतील.
काही काळापासून भारतातही आपण ड्रग्स, गांजा, narcotics control bureau सारखे शब्द बातम्यांमध्ये ऐकतोय. मात्र अमेरिकेसह जगभरातल्या अनेक देशांमध्ये गांजाच्या कायदेशीर वापराला, काही काही ठिकाणी वैद्यकीय उपचारांसाठीसुद्धा परवानगी दिली जातेय.
गांजाला विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे की यामुळे लोक व्यसनाधीन होत जातील आणि त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हे धोक्याचं आहे.
तर आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत – की अनेक देश आता गांजाच्या वापराला परवानगी का देत आहेत? आणि भविष्यात आपल्याला गांजा अगदी सहज मिळू शकेल का?
या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आम्ही काही तज्ज्ञांशी चर्चा केली.
संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - मानसी दाश
एडिटिंग - तिलक राज भाटिया
7/23/2022 • 18 minutes, 46 seconds
भारतात हवामान बदलामुळे जगणं कठीण होत चाललंय का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
या वर्षी भारतातला उन्हाळा असह्य झाला होता. पाऱ्याने यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले. मे महिन्यात अनेक ठिकाणी तापमान 47-48 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहचलं होतं. एका अंदाजानुसार या 'हीट वेव्ह'मध्ये भारत आणि पाकिस्तानात कमीत कमी 90 लोकांचा बळी गेला होता.
दुसरीकडे जुलैच्या पहिल्याच आठवड्यात किमान पाच राज्यांमध्ये पुराने थैमान घातलं आहे. एकट्या महाराष्ट्रात या वर्षी पावसाने सत्तरहून जास्त बळी घेतले आहेत.
आज आपण गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की भारतातलं हवामान इतकं बिघडलंय का की इथे राहणंसुद्धा आता कठीण झालंय?
आत्ताच ऐका संपूर्ण एपिसोड.
मूळ संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया
7/16/2022 • 18 minutes, 46 seconds
आपण तथ्यांवर विश्वास का ठेवत नाही? सत्य गोष्टींवर शंका का घेतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
सत्य घटनेवर आधारित सिनेमे अनेकदा वास्तवाशी, तथ्यांशी छेडछाड करताना दिसतात, आणि त्यामुळे वादही निर्माण होतात. पण काही लोक या सिनेमांचा सोशल मीडियावर बचाव करताना दिसतात. आणि त्यामुळे खरंच प्रश्न पडतो, की लोकांना, प्रेक्षकांना खरंच तथ्यांशी, वास्तवाशी काही घेणंदेणं आहे की नाही?
आज आपण गोष्ट दुनियेची ऐकताना याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की खरंच आपण आजच्या जगात तथ्यांचा विचार करतो का?
मूळ संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - तिलक राज भाटिया
7/9/2022 • 18 minutes, 51 seconds
धूम्रपान आपण खरंच का करतो? सिगरेट ओढण्याचं व्यसन सोडणं किती अवघड? BBC News Marathi
दरवर्षी जवळजवळ 80 लाखांपेक्षा जास्त लोक स्मोकिंगचे बळी ठरतात. यातले साधारण 70 लाख लोक प्रत्यक्ष तंबाखूच्या सेवनामुळे मरण पावतात, तर सुमारे 12 लाख लोक आजूबाजूला धूम्रपानाच्या धुरामुळे जीव गमावतात, असं UNची आकडेवारी सांगते.
पण तरीही आज जगभरात कित्येक लोक स्मोक करतात. आपल्याकडे सिनेमात कुणीही पडद्यावर धूर काढताना दिसलं की लगेच कोपऱ्यात इशारा येतो... smoking is injurious to health. पण तरीसुद्धा जगभरात जवळजवळ एक अब्ज लोक धूम्रपान करतातच. असं का?
आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की आपण धूम्रपान खरंच का करतो? आणि सिगरेट सोडणं खरंच अवघड आहे का? या प्रश्नांची उत्तरं मिळवायला आपण चर्चा करणारोत, चार तज्ज्ञांबरोबर.
मूळ निर्मिती: द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती : वात्सल्य राय
एडिटिंग: तिलक राज भाटिया
7/2/2022 • 18 minutes, 43 seconds
भाग 34: 100 वर्षांपर्यंत जगायला काय करावं? दीर्घायुष्याची गुरुकिल्ली | गोष्ट दुनियेची BBC News Marathi
तुमच्याही ओळखीच्यां पैकी कुणा ना कुणी असेलच, कुणाचे बाबा किंवा आजोबा किंवा पणजोबा, ज्यांनी आयुष्याची सेंच्युरी गाठली असेलच. त्यांच्या या दीर्घायुष्याची गुरुकिल्ली नेमकी काय? आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की खरंच शंभर वर्षांपर्यंत जगण्याचा मंत्र काय आहे?
ऐका हा संपूर्ण एपिसोड.
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटिंग - तिलक राज भाटिया
6/25/2022 • 16 minutes, 44 seconds
भाग 33: आंतरराष्ट्रीय योग दिन - योगा जगभरात एवढा लोकप्रिय कसा झाला? BBC News Marathi
दरवर्षी 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. वाराणसी ते वॉशिंग्टन, आज सगळीकडे योग केला जातो. कदाचित तुम्हीसुद्धा करत असालच.
अगदी प्राचीन काळापासून केली जाणारी ही क्रिया मुख्यत्वे मानसिक आणि अध्यात्मिक शांततेची, संतुलनाची आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून ओळखली जाते.
पण योग ही कला जगभरात इतका लोकप्रिय कशी झाली? आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की योगाचं आजचं हे भव्य जागतिक रूप नेमकं कशामुळे झालं?
ऐका ही गोष्ट दुनियेची.
मूळ निर्मिती: The Why Factor, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
एडिटिंग: तिलक राज भाटिया
6/18/2022 • 19 minutes, 7 seconds
भाग 32: शालेय परीक्षांमध्ये मुली मुलांवर मात कशी करतात? BBC News Marathi
आता 10वी-12वीच्या निकालांचा काळ आहे. आणि निकाल म्हटलं की प्रत्येक वेळी एक हेडलाईन पाहायला मिळतेच – ‘मुलींचीच सरशी, मुलांना मागे टाकलं’.
असं का होतं? शालेय परीक्षांमध्ये मुलीच मुलांवर मात कशी करतात? ऐकू या ही खास परीक्षांच्या निकालांच्या तोंडावर विशेष गोष्ट दुनियेची.
मूळ निर्मिती: द इन्कावयरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आण ि आवाज: गुलशनकुमार वनकर
एडिटिंग: तिलक राज भाटिया
6/11/2022 • 22 minutes, 49 seconds
भाग 31: प्लास्टिक बॉटलचा वापर आपण बंद करू शकतो का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
आज जगभरात दर मिनिटाला 10 लाखांपेक्षा जास्त प्लास्टिक बाटल्या विकल्या जातात, वर्षाला किमान 400 अब्ज. एक अभ्यास सांगतो, खरोखरंच 2050 पर्यंत आपल्या समुद्रात माशांपेक्षा प्लास्टिक जास्त असेल आणि त्या माशांच्या पोटातही प्लास्टिकच असेल.
मग आपण प्लास्टिकच्या बाटल्या वापरणं बंद का नाही करू शकत? ऐका ही खास पर्यावरण दिन विशेष गोष्ट दुनियेची.
मूळ निर्मिती: द इन्कावयरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
एडिटिंग: तिलक राज भाटिया
6/4/2022 • 18 minutes, 44 seconds
जगभरात डास आपण मारून का नाही टाकत? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
दरवर्षी आपल्याला डासांचा त्रास सहन करावा लागतो. कुठे मलेरिया, कुठे डेंगू, कुठे चिकुनगुन्याची साथ पाहायला मिळते.
तर यंदा आपण गोष्ट दुनियेची ऐकताना एका प्र श्नाचं उत्तर शोधणार आहोत, की आपण जगभरातल्या डासांना एकदाचं संपवून का नाही टाकत?
मूळ निर्मिती: द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती – वात्सल्य राय
एडिटिंग: तिलक राज भाटिया
5/28/2022 • 20 minutes, 4 seconds
भाग 29 - सेंद्रिय शेतीच्या स्वप्नाने श्रीलंकेचं वाटोळं केलं का?
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाभया राजपक्षे यांनी एप्रिल 2021 मध्ये घोषणा केली की देशातली संपूर्ण शेती सेंद्रीय किंवा ऑरगॅनिक पद्धतीने केली जाईल. ही योजना जितकी महत्त्वाकांक्षी होती, तितकीच ती अनियोजितसुद्धा होती. त्यामुळेच आज श्रीलंका ज्या आर्थिक गर्तेत सापडलाय, त्यासाठी या निर्णयालासुद्धा जबाबदार ठरवलं जातं. आपण गोष्ट दुनियेची ऐकताना हेच जाणून घेणार आहोत, की खरच सेंद्रिय शेतीमुळे श्रीलंकेचं वाटोळं झालं का?
मूळ निर्मिती: द इन्कावयरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार व नकर
एडिटिंग: तिलक राज भाटिया
5/21/2022 • 21 minutes, 31 seconds
भाग 28: खरंच युरोप रशियाकडून गॅस विकत घेणं बंद करू शकतो का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
नॉर्ड स्ट्रीम-1 – जगभरात चर्चेचा विषय असलेली ही पाइप लाईन बाल्टिक सागराच्या खालून जाणारा आणि रशियाला जर्मनीशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. कुणे एके काळी या पाईपलाईनला जर्मनी आणि रशियामधल्या विश्वासाच्या नात्याचं प्रतीक मानलं जायचं. रशियाहून येणाऱ्या या गॅसपासून युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होते. पण युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यापासून युरोप रशियावर संतापलाय आणि त्याच्यापासून दूर जायचा प्रयत्न करतोय. त्यामुळे युरोपियन युनियनने या वर्षाच्या अखेरपर्यंत रशियाकडून गॅस खरेदी थांबवायचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयावर अद्याप सर्वच देशांचं एकमत नाहीय, त्यामुळेच आपण या आठवड्यात गोष्ट दुनियेची ऐकताना याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की खरंच युरोप रशियाकडून गॅस विकत घेणं बंद करू शकतो का?
या प्रश्नाचं उत्तर मिळवायला आपण चर्चा करणार आहोत चार तज्ज्ञांबरोबर.
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - वात्सल्य राय
एडिटर – तिलक राज भाटिया
5/14/2022 • 16 minutes, 32 seconds
भाग 27: आपण कोरोनावरची एक कायमची सर्वंकश लस नाही का बनवू शकत? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
गेल्या दोन वर्षांत जवळजवळ जगातल्या प्रत्येक देशाने कोविडची लाट पाहिलीय. आता पुन्हा याचा उद्रेक चीनमध्ये पाहायला मिळतोय आणि भारतातही काही ठिकाणी केसेस वाढताना दिसत आहेत. अशात एक प्रश्न विचारला जाणं सहाजिक आहे – की आपल्या सध्याच्या लशी या नवीन व्हेरियंट्सवर काम करतील की नाही?
तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की आपण कायमची एक अशी लस नाही का बनवू शकत जी सगळ्याच कोरोना व्हेरिअंट्सवर काम करू शकेल?
5/7/2022 • 18 minutes, 10 seconds
भाग 26: इलॉन मस्क यांची टेस्ला कंपनी जगातली सर्वांत मोठी कार उत्पादक कशी बनली? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
या आठवड्यातली सर्वांत मोठी बातमी कदाचित हीच असेल, की इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतलंय. ट्विटर, ज्यावर 280 कॅरॅक्टर्समध्ये तुम्हाला तुमचं म्हणणं मांडायचं असतं. ते जगातलं सर्वांत मोठं तर नाही, पण नक्कीच सर्वांत जास्त प्रभाव टाकणारं सोशल मीडिया ॲप आहे.
कुठेही बाँबस्फोट झाला वा भूकंप, कुठे सरकार पडलं वा कुठली मोठी राजकीय उलाढाल झाली, पहिली बातमी इथेच फुटते, पहिल्या प्रतिक्रिया इथेच उमटतात. त्यामुळे अशा अवाढव्य पण तितक्याच वादग्रस्त प्लॅटफॉर्मला सुधारण्याचा बेत इलॉन मस्क यांचा आहे. हे वेगळ्याने सांगायला नको की यामुळे त्यांना जगावर एक वेगळीच छाप पाडण्याची आणखी एक संधी प्राप्त होताना दिसतेय.
यापूर्वीसुद्धा त्यांनी इलेक्ट्रिक कार टेस्ला बनवून सर्वच दिग्गज कार उत्पादकांना विद्युतीकरणाकडे वळायला भाग पाडलंय.
पण मुळात इलॉन मस्क कोण आहेत? टेस्ला, स्पेसएक्स, न्युरालिंक आणि द बोरिंग कंपनीसारख्या क्रांतिकारी स्टार्टअप्सचे जनक जगावर किती प्रभाव पाडत आहेत? आणि त्यांची टेस्ला ही कार कंपनी जगातली सर्वांत मोठी कंपनी कशी बनली?
जाणून घेणार आहोत, आपण या आठवड्याची गोष्ट दुनियेची ऐकताना.
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - मानसी दाश
एडिटर – तिलक राज भाटिया
4/30/2022 • 17 minutes, 31 seconds
भाग 25: भविष्यातले युद्ध ड्रोन लढतील का? रशिया युक्रेन यु द्ध | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियन सैन्याचा एक मोठ्ठा ताफा युक्रेनची राजधानी कीव्हकडे कूच करताना दिसत होता. तिकडे कीव्हमध्येही रशियाच्या या हल्ल्याचा सामना करायची तयारी सुरू होती. रशियन सैन्य युक्रेनपेक्षा कैक पटींनी मोठं आहे – त्यांची संरक्षण क्षेत्रातली गुंतवणूक, लष्करी विमानं, रणगाडे, आणि लष्करी साधनांचं उत्पादन आणि शस्त्रसाठा युक्रेनच्या तुलनेत खूप जास्त मोठा आहे. पण काही आठवड्यांपूर्वी हे स्पष्ट झालं की रशियन सैन्याला युक्रेनमध्ये पुढे सरकताना खूप संघर्ष करावा लागतोय. यामुळे त्यांना बऱ्याच रात्री युक्रेनच्या थंड प्रदेशात कुडकुडत काढाव्या लागतायत. आणि स्वतःला गरम ठेवायला त्यांना गाड्यांचे, रणगाड्यांचे इंजिन दिवसरात्र सुरू ठेवावे लागत आहेत. याचा फायदा युक्रेनने घ्यायचं ठरवलं. गाड्यांचे इंजन गरम असल्यामुळे त्यांनी ड्रोन्स पाठवून रात्री अंधारातही रशियन ताफ्याचं अचूक लोकेशन वेधून, त्यावर हल्ले केले. हे एक वेगळीच युक्ती होती, ज्यामुळे रशियाला अनपेक्षित नुकसान सोसावं लागलं. तर यंदाची गोष्ट दुनियेची हीच, या युद्धाचा निकाल ड्रोन्सचा वापर ठरवू शकेल का? आणि भविष्यातले युद्धसुद्धा ड्रोन्स लढतील की काय?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती - मानसी दाश
एडिटर – तिलक राज भाटिया
4/24/2022 • 17 minutes, 5 seconds
भाग 24: व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमधल्या युद्ध गुन्ह ्यांसाठी शिक्षा होऊ शकते का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनशेजारच्या पोलंडमध्ये तेच वक्तव्य पुन्हा केलं, जे अमेरिकन प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी केलं होतं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या मारियोपोलमध्ये युद्ध गुन्हा केलाय, war crime केलाय, असा आरोप त्यांनी केला.
याच दरम्यान नेदरलँड्सच्या द हेगमध्ये 38 देशांचे प्रतिनिधी एकत्र आले. या देशांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कोर्टात रशियाविरुद्ध युद्ध गुन्ह्यांची चौकशी करण्याची विनंती केली. तर या आठवड्यात गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की खरंच व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमधल्या युद्ध गुन्ह्यांसाठी आंतरराष्ट्रीय कोर्टात आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाऊ शकतं का? इतिहासात असं कधी घडलंय का?
मूळ निर्मिती – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माती – मानसी दाश
एडिटिंग – तिलक राज भाटिया
4/16/2022 • 17 minutes, 35 seconds
भाग 23: रशियाला युक्रेन जिंकायला एवढा संघर्ष का करावा ला गतोय? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
युक्रेनवर रशियाने हल्ला केल्यानंतर एक महिन्यानंतरही रशिया कीव्हवर नियंत्रण नाही मिळवू शकलाय. त्यांचं सैन्य जवळजवळ शून्य डिग्री तापमानात संघर्ष करताना दिसतंय. कुठे ट्रक दलदलीत फसून निकामी होतायत तर कुठे इंधन पुरवठाच होत नसल्याने ताफा खोळंबलाय. तर युक्रेनच्या इतर भागांमध्ये भुकेने व्याकूळ झालेल्या रशियन सैनिकांनी दुकानं लुटल्याच्या बातम्या येतायत.
यामुळे जगातल्या सर्वांत मोठ्या लष्करी शक्तींपैकी एक मानल्या जाणाऱ्या रशियन सैन्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलेत, की ते युक्रेनला हरवू का नाही शकत आहेत? तर आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की युद्धाच्या दीड महिन्यानंतरही रशिया कीव्हवर कब्जा का नाही करू शकलंय?
मूळ निर्मिती - द इंक्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
सहनिर्मिती – मानसी दाश
एडिटिंग - तिलक राज भाटिया
4/9/2022 • 16 minutes, 47 seconds
भाग 22: NFT म्हणजे नेमकं काय? क्रिप्टो जगात आपलं विश्व कसं बदलेल? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
2005 मध्ये झोई रॉस या पाच वर्षांच्या मुलीचा एक फोटो व्हायरल झाला. ती एका जळत्या घरासमोर उभी होती, आणि ती अशी हसत होती, जणुकाही ती आग तिनेच लावलीय किंवा तिला त्याचा आनंद झालाय. तिचा हा फोटो इतका व्हायरल झाला की तिचं मीमच बनलं – The Disaster Girl.
त्यानंतर एप्रिल 2021 मध्ये त्याच फोटोची विक्री 4 लाख 73 हजार डॉलर्सना करण्यात आली, पण एक NFT म्हणून. NFT म्हणजे non fungible token – म्हणजे एकप्रकारे त्या फोटोच्या मालकीचं डिजिटल प्रमाणपत्र. पण तुमच्याकडे तो ओरिजिनल फोटो नाही, त्याची कॉपी करण्याचाही तुम्हाला अधिकार नाही. आणि हे डिजिटल प्रमाणपत्र तुम्ही एखाद्या पेंटिंगसारखं तुमच्या हॉलमधल्या भिंतीवरही टांगू शकत नाही.
अशाच प्रकारे, जगातलं पहिलं वहिलं ट्वीटसुद्धा 29 लाख डॉलर्सना NFTच्या रूपात विकलं गेलं होतं. आणि इंद्रधनुष्याच्या रंगांच्या मांजरीचं एक चित्र चक्क 6 लाख 90 हजार डॉलर्सला विकलं गेलं होतं.
पण या काही जगात कुठेतरी क्वचितच घडलेल्या घटना नाहीत. NFTsचा बाजार मोठा होत चाललाय. आणि एका अंदाजानुसार एकट्या 2021 मध्ये 21 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्तीचे NFT व्यवहार जगभरात करण्यात आले. भारतातही असेच व्यवहार आता सिने आणि कलाक्षेत्रात होताना दिसतायत.
त्यामुळे पुढे चालून आपण डिजिटल विश्वात असाच पैसा खर्च करू का, असा प्रश्न विचारला जातोय. पण मुळात NFT असतं तरी काय? आणि खरंच याने आपलं डिजिटल विश्व बदलणार आहे का?
याच प्रश्नाचं उत्तर मिळवायला आपण चर्चा करणार आहोत, चार तज्ज्ञांबरोबर.
मूळ निर्मिती - द इंक्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - तिलक राज भाटिया
4/2/2022 • 21 minutes, 1 second
भाग 21: बिटकॉईनच्या जन्माची गूढ, रंजक गोष्ट - क्रिप्टोकरंस ी कुणी का आणली? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
#BBCMarathi #History #Bitcoin #CryptoCurrency #गोष्टदुनियेची
22 मे, 2010 रोजी अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील जॅकसनविलमध्ये लॅझलो हॅन्येक्झ याने दोन लार्ज पिझ्झांसाठी दिले 10 हजार बिटकॉइन. हा जगातला पहिला बिटकॉइन व्यवहार होता. .
तेव्हा 10 हजार बिटकॉइन्सचं मूल्य साधारण 40 डॉलर्स असेल. आज 2022 मध्ये याच 10 हजार बिटकॉइन्सचं मूल्य अब्जावधी रुपयांमध्ये असेल. बिटकॉइनच्या मूल्याचा काही भरवसा नसतो, कधी अचानक वर जातं, कधी गडगडतं.
पण आपल्याकडे आधीच डॉलर्स, पाउंड्स आणि रुपयांसारखी चलनं असताना, हा बिटकॉइनने व्यवहार करण्याचा उद्योग का कुणी सुरू केला? यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की बिटकॉइन ही नेमकी काय भानगड आहे? याची गरज तरी काय आहे?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
एडिटर – तिलक राज भाटिया
3/26/2022 • 21 minutes, 33 seconds
भाग 20: रशिया युक्रेन एकच आहेत, असा आग्रह व्लादिमीर पुतिन का करतात?
12 जुलै 2021 – रशियाच्या सरकारी वेबसाइटवर युक्रेनबद्दल जवळजवळ साडेसहा हजार शब्दांचा एक लेख प्रकाशित झाला. या लेखात रशिया आणि युक्रेनच्या गेल्या अनेक शतकांच्या संयुक्त इतिहासाची माहिती सविस्तर लिहिण्यात आली होती. यात दावा करण्यात आला होता की रशिया, युक्रेन आणि बेलारूसमध्ये राहणाऱ्यांचे पूर्वज हे मुळात प्राचीन रशियन लोकच होते, आणि कोणे एके काळी हा विशाल प्राचीन स्लाविक देश युरोपातला सर्वांत मोठा देश होता.
हा लेख लिहिला होता रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी. त्यांच्यानुसार 20व्या शतकाच्या सुरुवातीला युक्रेनने आपली एक वेगळी ‘काल्पनिक‘ ओळख निर्माण करायला सुरुवात केली. आणि मग रशियाविरोधी पाश्चात्त्य शक्तींचा प्रभाव युक्रेनवर पडत गेला, ज्यामुळे युक्रेन रशियाला शत्रू समजू लागला.
पुतिन यांचा हा दावा कितपत खरा आहे? रशिया आणि युक्रेन यांचा संयुक्त इतिहास नेमका काय आहे?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया
3/19/2022 • 20 minutes, 41 seconds
भाग 19: रशिया युक्रेन युद्ध व्लादिमीर पुतिन यांच्यावर निर्बंध लादून संपेल का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
24 फरवरी 2022 ला रशियाने पूर्व, पश्चिम आणि दक्षिण अशा तीन बाजूंनी युक्रेनवर आक्रमण केलं. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर बाहेर पडलेला युक्रेन दुसरा सर्वांत मोठा देश होता.
रशियाच्या हल्ल्यावर जगभरातून पडसाद उमटले. संयुक्त राष्ट्र, युरोपियन महासंघ, अमेरिका, ब्रिटेन, कॅनडासह अनेक देशांनी रशियावर कडक आर्थिक निर्बंध लावायला सुरुवात केली.
पण आर्थिक निर्बंध लादलेला रशिया काही पहिला देश नव्हता. यापूर्वीसुद्धा क्युबा, इराक, दक्षिण आफ्रीका आणि उत्तर कोरियावरही अशाच प्रकारे दबाव टाकायचा प्रयत्न झाला होता. पण तरीही रशियाने आपली कारवाई सुरू ठेवलीच आहे, त्यामुळे असले निर्बंध लादल्याने खरंच फरक पडणार का? असा प्रश्न सगळेच विचारतायत.
तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की खरंच आर्थिक निर्बंध लादून देशांना त्यांची भूमिका बदलायला लावता येऊ शकते का? याचं उत्तर मिळवायला आपल्यासोबत चर्चेला आहेत चार तज्ज्ञ.
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
सहनिर्मात्या - मानसी दाश
ऑडिओ एडिटिंग - तिलक राज भाटिया
3/12/2022 • 19 minutes, 13 seconds
भाग 18: रशिया युक्रेन संघर्षाचं अणू युद्धात रूपांतर होऊ शकतं का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
24 फेब्रुवारी 2022, रशियात सकाळची वेळ. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनच्या पूर्वेकडील भागात विशेष लष्करी कारवाईची घोषणा केली आणि आधीच सीमावर तैनात रशियन सैन्याला युक्रेनमध्ये घुसण्याचे आदेश दिलेत.
यानंतर 27 फेब्रुवारीला रशियन राष्ट्राध्यक्षांनी आपली अण्वस्त्र हाई अलर्टवर ठेवण्याचे आदेश दिलेत.
जगात अण्वस्त्रांचा सर्वांत मोठा साठा रशियाजवळ आहे. अशात जाणकारांना भीती आहे की पुतीन यांची ही घोषणा एका मोठ्या जागतिक संकटाची सुरुवात आहे. अण्वस्त्र किंवा nuclear weapons फक्त रशियाकडेच आहेत, असं नाही. अमेरिका, चीन, ब्रिटेनसह अगदी भारत, पाकिस्तान आणि उत्तर कोरियासुद्धा काही अण्वस्त्रधारी आहेत.
त्यामुळे कुणालाच हा संघर्ष चिघळू नये, असंच वाटतं. कारण जर न्युक्लिअर बटण दाबायची वेळ आली, तर मोठा अनर्थ ओढवेल.
तर यंदा आपण गोष्ट दुनियेची ऐकताना याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की अण्वस्त्र वापरण्याची वेळ खरंच कधी ओढवू शकते? याचे काही प्रोटोकॉल आहेत का?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया
3/5/2022 • 22 minutes, 3 seconds
भाग 17: टर्कीमध्ये महागाईवर एर्दोआन कशी मात करणार? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
टर्कीचं चलन लिराचं मूल्य सतत घसरतंय. त्यामुळे टर्कीमध्ये महागाई प्रचंड वाढलीय. अर्थतज्ज्ञांचं म्हणणंय की महागाईला नियंत्रणात ठेवायला देशातल्या केंद्रीय बँकेने व्याज दरात वाढवायला हवेत. पण टर्कीमध्ये असं होताना दिसत नाहीय, कारण राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोआन व्याजदर वाढविण्याच्या विरोधात आहेत. पुढच्या वर्षी इथे निवडणुका होणार आहेत आणि वाढत्या महागाईने जनता हैराण आहे, त्यामुळे एर्दोआन यांची लोकप्रियतासुद्धा कमी होताना दिसतेय. तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण यावरच बोलणार आहोत, की फक्त महागाईमुळे देशाच्या राष्ट्राध्यक्षावर सत्ता गमावण्याची वेळ येऊ शकते का?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया
2/26/2022 • 17 minutes, 12 seconds
भाग 16: ग्रीन इलेक्ट्रिसिटी - खरंच आपण आपलं पूर्ण जग विजेवर चालवू शकतो का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात युकेमधल्या एका प्रयोगशाळेत न्युक्लिअर फ्यूजनच्या मदतीने 5 सेकंदांमध्ये 59 मेगाज्यूल ऊर्जा किंवा 11 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात आली. 1997 मध्ये अशाच प्रकारच्या प्रयोगांमधून जे यश मिळालं होतं, हे त्याच्या दुपटीपेक्षा जास्त होतं, त्यामुळे हा आजवरचा विश्वविक्रमच म्हणावा.
यात अजूनही अनेक तांत्रिक अडचणी आहेत, पण जर हा प्रयोग यशस्वी झाला आणि याचं प्रमाण आणखी वाढवता आलं, तर मानवापुढच्या एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल – तो म्हणजे क्लीन एनर्जीचा प्रश्न. अर्थात कुठलंही प्रदूषण न करता, कुठल्याही नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास न करता ऊर्जा मिळवण्याचा प्रश्न.
खरंतर मानवाचं स्वच्छ ऊर्जेचं हे स्वप्न अनंत काळापासूनचं आहे. आजही कोळसा आणि पेट्रोलऐवजी आपण विजेवर आपली कामं करू शकतो का, याचाच शोध सर्वत्र घेतला जातोय. तर आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की खरंच आपण आपलं अख्खं जग विजेवर चालवू शकतो का?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया
2/19/2022 • 16 minutes, 55 seconds
भाग 15: पुढचं महायुद्ध अंतराळात होणार का? स्पेस वॉरची शक् यता किती? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
#BBCMarathi #SpaceMissions #Russia #US #गोष्टदुनियेची
1982मधे सोवियत संघाने कॉसमॉस-1408 नावांचं एक गोपनीय उपग्रह अंतराळांत लाँच केलं. पण दोनच वर्षात ते खराब झालं, आणि त्याच्या कक्षेत आजवर ते तसंच फिरत राहिलं. अखेर नोव्हेंबर 2021मध्ये रशियाने एक अँटी-सॅटलाइट मिसाइल लॉन्च करत याला नष्ट केलं. पण याचे जवळजवळ 1,500 तुकड़े अंतराळात पसरले. यापूर्वी अमेरिकेने 2008मध्ये आणि चीनने 2007मध्ये असंच केलं होतं.
पण रशियाने आता असं केल्यावर त्याच्यावर कडाडून टीका झाली, कारण या सॅटलाइटचे तुकडे कुठल्या एखाद्या अंतराळयानाला जाऊन धडकू शकतात किंवा एखाद्या उपग्रहात बिघाड आणू शकतात, ज्यामुळे मोठं नुकसान सोसावं लागलं असतं.
जाणकारांनुसार रशियाने हे करून दाखवून दिलंय की ते कुठल्याही कायद्याचं उल्लंघन न करता अंतराळात सॅटलाइट नष्ट करू शकतात. आत्ता त्यांनी त्यांचा स्वतःचा सॅटलाईट नष्ट केलाय, पण पुढच्या वेळेसही असंच होईल, असं नाहीय.
तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत, की अंतराळात कुणी काय करावं, काय करू नये, याचे काही कायदे आहेत का?आणि जगभरातल्या देशांमध्ये आता स्पेस वॉर होऊ शकतं का?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया
2/12/2022 • 17 minutes, 31 seconds
भाग 14: तुरुंगात येणारे ड्रग्स आपण थांबवू शकतो का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
तुरुंगात ड्रग्सचा प्रॉब्लेम जगभरात आहे, आणि सगळीकडेच न्यायपालिका या समस्येला तोंड देत आहेत, कारण तुरुंगांमध्ये अमली पदार्थ अखेर पोहोचतात कसे, हा त्यांच्यासमोरचाही मोठा प्रश्न आहे, ज्याचं उत्तर कुणालाही सापडेना.
तर या आठवड्यात आपण गोष्ट दुनियेची ऐकताना याच एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की तुरुंगांमध्ये पोहोचणाऱ्या ड्रग्सला आळा कसा घालावा? यावर चर्चा करायला आमच्यासोबत आहेत चार तज्ज्ञ.
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया
2/5/2022 • 16 minutes, 48 seconds
भाग 13: 5G मुळे कोरोना पसरतो, अशा अफवा कुठून येतात? कशा पसरतात? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
काही दिवसांपूर्वी अमेरिकेत AT&T आणि Verizon सारख्या टेलेकॉम कंपन्या 5G सेवा सुरू करणार होत्या. पण हे नवीन 5G सिग्नल, जे आपला मोबाईल आणि इंटरनेट वापर आणखी वेगवान करू शकतात, ते काही विमानांमध्ये तांत्रिक बिघाड आणू शकतात, असं सांगत एअरबस आणि बोइंग या विमान निर्मात्यांनी 5g सेवा सध्या सुरू करू नका, अशी मागणी केली.
5G बद्दल आपण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ऐकतोय, पण अजूनही जगभरात त्याविषयी सांशकताच आहे. 2020च्या सुरुवातीला जेव्हा जगभरात कोरोनाचा उद्रेक होत होता, तेव्हा अनेक देशांमध्ये 5G मोबाइल टॉवर्सवर हल्ल्यांच्या बातम्या येत होत्या. एकट्या ब्रिटनमध्ये दोन महिन्यांत 77 मोबाइल टॉवर्स पेटवून देण्यात आले. अशाच घटना नेदरलँड्स, इटली, बेल्जियम, साइप्रस, फ्रांससह जवळजवळ पूर्ण युरोपात घडताना दिसत होत्या.
कारण काय? तर एक अफवा की 5G तंत्रज्ञानामुळे कोरोना व्हायरस वेगाने पसरू शकतो. तेव्हा असा दावा करणारे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर फिरत होते. तुम्हाला आठवत असेल, काही महिन्यांपूर्वी भारतातही अभिनेत्री जुही चावलाने कोर्टात एक याचिका दाखल करत 5G नेटवर्कला विरोध केला होता.
तर या आठवड्यात गोष्ट दुनियेची ऐकताना आपण जाणून घेणार आहोत, की खरंच लोक 5G मोबाइल technologyला एवढे का घाबरतायत? इतके तथ्य आणि पुरावे असतानाही लोक अशा अफवांना बळी का पडतात?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया
1/29/2022 • 16 minutes, 55 seconds
भाग 12: अंतराळातला कचरा आपण कसा साफ करणार? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
अंतराळात वेगवेगळ्या स्पेस मिशनचे कित्येक लहानमोठे तुकडे तरंगत आहेत, ज्यांपासून इतर मोहिमांना धोका कायम आहे. अंतराळातल्या कचऱ्याचा हा प्रश्न मोठा आहे, कारण यामुळे हे स्पेस मिशन्स संकटात सापडू शकतात.
पण या कचऱ्याची विल्हेवाट आपण लावू शकतो का, जेणेकरून भविष्यात असे धोके टाळता येतील? या प्रश्नांची उत्तरं आज आपण गोष्ट दुनियेची ऐकताना मिळवणार आहोत.
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया
1/22/2022 • 16 minutes, 14 seconds
भाग 11: क्वांटम कंप्युटिंग काय असतं? जगात वेगवान कंप्युटर्स बनवायची शर्यत का? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
भविष्यात क्वांटम कंप्युटिंगमुळे आपलं जग आणि आपलं आयुष्य मोठ्या प्रमाणावर बदलू शकतं. या नवीन तंत्रज्ञानाचं महत्त्व लक्षात घेऊनच 2020च्या अर्थसंकल्पात भारत सरकारनेही या तंत्रज्ञानाच्या विकासासाठी 8 हजार कोटींची तरतूद केली होती. भारताच नव्हे तर जगातले अनेक मोठे देश आणि काही कंपन्यासुद्धा क्वांटम कम्प्युटर्सच्या विकासासाठी मोठमोठी गुंतवणूक करत आहेत.
तर यंदाची गोष्ट दुनियेची याच विषयावर, की हे क्वांटम कंप्यूटर्स नेमके काय असतात आणि त्यांच्यावरील संशोधन आणि विकासासाठी जगभरातल्या देशांमध्ये एकप्रकारची शर्यत का सुरू आहे?
ऐका संपूर्ण एपिसोड.
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया
1/15/2022 • 18 minutes, 29 seconds
भाग 10: महागाईला आळा घालायला सरकारने काय करावं? | गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
संपूर्ण जगभरात अन्नाधान्य, तेल, वीज आणि इतर वस्तूंच्या किमती वाढत चालल्या आहेत. अगदी दररोज लागणारा चहाही आता गोड लागत नाही, इतके साखरेचे भावही वधालयेत.
बऱ्याच देशांनी अनेक वर्ष महागाई पाहिलेली नव्हती, पण कोरोनाची साथ फक्त आरोग्याचंच नव्हे तर एक आर्थिक संकटही घेऊन आलीय, जे गेल्या दशकभरात पाहण्यात आलं नव्हतं. महागाईवर नियंत्रण मिळवायला अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनी व्याज दर वाढवले. पण ही दुधारी तलवार आहे, आणि यामुळे अर्थव्यवस्था जरा सुस्तावण्याची शक्यता असते. त्यामुळे या साथीतून पुन्हा उभारी घेऊ पाहणाऱ्या economiesसाठी हे पाऊल धोक्याचं ठरणार की काय, अशीही एक भीती आहे.
तर या आठवड्यात गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर सोधणार आहोत, की आत्ताची ही महागाई खरंच किती काळ राहील? तिला आळा घालायला सरकारांनी काही पावलं उचलावीत की नाही?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया
1/8/2022 • 16 minutes, 43 seconds
भाग 9: एलियन्स खरंच असतात का? परग्रहावर जीवन शक्य आहे का?
25 डिसेंबर 2021 रोजी फ्रेंच गियानाच्या एका स्पेसपोर्टवरून जेम्स वेब नावाची एक महाकाय दुर्बिण अवकाशात झेपावली. ज्या बिगबँगपासून झाली, विश्वाची उत्पत्ती, तेव्हा जन्माला आलेल्या काही अगदी सुरुवातीच्या ताऱ्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न ही दुर्बिण करणार आहे. तब्बल १० अब्ज डॉलर्सचा खर्च आणि तीस वर्षांच्या संशोधनानंतर तयार झालेली ही दुर्बिण मुळात दूरच्या ग्रहांवर जीवनाची शक्यता पडताळून पाहणार आहे.
त्यामुळे आजवर शास्त्रज्ञांना पडलेला सर्वांत मोठा प्रश्न आता सगळेच विचारू लागलेत... की या संपूर्ण सृष्टीत पृथ्वीच्या शिवाय इतर कुठे जीवन आहे का? आणि जर आहे तर ते कसं आहे?
तर आज आपण गोष्ट दुनियेची ऐकताना याच प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत, की या शास्त्रज्ञांना एलियन्सना शोधण्यात यश येईल का? आणि पृथ्वीशिवाय दुसऱ्या एखाद्या ग्रहावरही जीवन आहे का?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया
1/1/2022 • 18 minutes, 23 seconds
भाग 8: ओमिक्रॉनची लाट आली तर तिचा सामना आपण कसा करू? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
या वर्षी नोव्हेंबरच्या मध्यात दक्षिण आफ्रिकेच्या बोत्सवानामध्ये शास्त्रज्ञ कोरोना व्हायरसच्या एका नवीन प्रकारच्या सँपलला निरखून पाहत होते. त्यांना या व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये असे अनेक बदल आढळून आले, जे यापूर्वी कधीही पाहण्यात आले नव्हते. याच्या तीन आठवड्यातच व्हायरसचा हा व्हेरिअंट जवळजवळ 40 देशांमध्ये पसरलेला होता. जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOने या व्हेरिअंटला नाव दिलं ओमिक्रॉन, आणि याला variant of concern अर्थात "चिंतेचा विषय" म्हटलंय.
WHOनुसार हा व्हेरिअंट डेल्टापेक्षा जास्त वेगाने पसरतोय, पण त्याच्यापेक्षा जास्त घातक आहे की नाही, हे आत्ताच सांगता येणार नाही. पण ज्या वेगाने आत्ता हा नवीन व्हेरिअंट युके, युरोपसह पाश्चात्त्य जगात धुमाकूळ घालतोय, त्यावरून एक प्रश्न नक्कीच विचारला जाणं साहजिक आहे, की कोरोना वायरसच्या या वेरिअंटची लाट आली तर तिचा सामना आपण आता कसा करू? आज गोष्ट दुनियेचीमध्ये आपण या क्षेत्रातल्या तज्ज्ञांसोबत चर्चा करून याच प्रश्नाचं उत्तर मिळवणार आहोत.
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया
12/25/2021 • 16 minutes, 34 seconds
भाग 7: फेसबुकचं मेटाव्हर्स काय आहे? ते आपलं आयुष्य नेमकं कसं बदलणार आहे?
28 ऑक्टोबर 2021 ला मार्क झकरबर्ग यांनी फेसबुकचं नाव बदलून मेटा केलं. आपली कंपनी आता एक नवीन विश्व, एक मेटाव्हर्स तयार करतंय, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. याबद्दल मार्क यांनी एका प्रेझेंटेशनमध्ये बरंच काही सांगितलं आणि दाखवलं. हे सारंकाही पाहायला भारी वाटलं, आणि मार्क झकरबर्ग सांगतायत की हे मेटाव्हर्स बनवायला त्यांची कंपनी अनेक अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. तर आज गोष्टी दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की फेसबुकचं मेटाव्हर्स ही नेमकी काय भानगड आहे? आणि यामुळे आपलं आयुष्य खरंच कसं बदलणार आहे?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया
12/18/2021 • 16 minutes, 39 seconds
भाग 6: वाढत्या लोकसंख्येचं पोट भरण्यासाठी आपल्याकडे पुरेसं अन्नधान्य असेल का?
1798 साली अर्थतज्ज्ञ थॉमस मॅल्थस म्हणाले होते की लोकसंख्या ज्या वेगाने वाढते, तितक्याच वेगाने जगभरात अन्नधान्य पिकवलं जात नाहीय. मॅल्थस यांच्यानुसार लोकसंख्या एकाचे दोन, दोनाचे चार अशा पद्धतीने वाढते, मात्र अन्नपदार्थांचं उत्पादन एकाचे दोन, दोनाचे तीन, तीनाचे चार, असंच होऊ शकते. म्हणजेच शंभर वर्षांमध्ये जगातील सर्व लोकांसाठी अन्नपुरवठा कदाचित कमी पडेल, असं त्यांचं म्हणणं होतं.
त्यांचं हे भाकित नेहमीच चर्चेत राहिलं, पण सुदैवाने प्रत्यक्षात तसं कधी झालं नाही. याच्या जवळपास 200 वर्षांनंतर अमेरिकन प्राध्यापक ख्रिस्तोफर बॅरट यांनी संयुक्त राष्ट्रात एका भाषणात म्हटलं की, येत्या काळात मानवापुढचं सगळ्यात मोठं संकट असेल अन्नाचा तुटवडा.
बॅरट म्हणाले की ही काहीशी अस्तित्वाचीच लढाई आहे, कारण जमिनीवरच्या आणि समुद्रातल्या संसाधनांसह पाण्याचे स्रोतही कमी होत जातील.
जगाची लोकसंख्या आज सुमारे 770 कोटी आहे, 2100 पर्यंत ही वाढून अगदी 1,100 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, त्यामुळे आज आपण गोष्ट दुनियेची ऐकताना एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत – वाढत्या लोकसंख्येचं पोट भरण्यासाठी आपल्याकडे पुरेसं अन्नधान्य असेल का?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया
12/11/2021 • 16 minutes, 57 seconds
भाग 5: हायपरसॉनिक मिसाइल काय असतं? आपण त्यापासून घाबरून जाण्याचं कारण आहे का?
ऑक्टोबर 2021 मध्ये चीनच्या आकाशात एक रॉकेटसारखी वस्तू खूप वेगाने उडताना दिसली होती. जवळपास पूर्ण पृथ्वीची परिक्रमा करून ही वस्तू तिच्या ठरवलेल्या लक्ष्याच्या सुमारे 40 किलोमीटर आधी कोसळली.
जाणकारांनुसार हे एक हायपरसॉनिक मिसाइल होतं, पण चीनने हे वृत्त फेटाळलं आहे. सामान्य स्वरलहरींपेक्षा कैक पट वेगाने उडणारी ही हायपरसॉनिक मिसाईल्स आता अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यातल्या पुढच्या जागतिक शर्यतीचं निमित्त्य बनली आहेत.
आज गोष्ट दुनियेची या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेऊ या की ही हायपरसॉनिक मिसाइल्स नेमकी काय असतात, आणि त्यांच्याविषयी आपण खरंच चिंता करण्याचं कारण आहे का?
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया
12/4/2021 • 17 minutes, 18 seconds
भाग 4 – जगभरात महागाई अचानक का वाढली आहे?
अनेक देशांमध्ये वस्तूंचा तुटवडा जाणवतोय, ज्यामुळे काही ठिकाणी किमतीसुद्धा वाढू लागल्या आहेत. भारतातही इंधनाच्या किमती वधारल्यामुळे इतर गोष्टीही महाग होत चालल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि ट्रेडिंग संघटनांनुसार परिस्थिती इतक्यात सुधरणार नाही.
तर आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत, की जगभरात महागाई अचानक का वाढली आहे? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी आम्ही काही तज्ज्ञांशी चर्चा केली.
संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा
एडिटर – तिलक राज भाटिया
11/27/2021 • 16 minutes, 4 seconds
भाग 3 - आपल्या पृथ्वीवरचं पाणी खरंच संपत चाललंय का?
मुंबई-पुण्यासह देशातल्या प्रत्येक महानगरात पावसाळ्यात थोड्याअधिक प्रमाणात पूरस्थिती निर्माण होते, तर उन्हाळा येता-येता जलाशय आटू लाग तात, आणि त्यामुळे पाणीटंचाईचं संकट ओढवतं. अनेकदा यासाठी पाणी व्यवस्थापनाचा अभाव आणि हवामान बदल अशा गोष्टींना दोष दिला जातो. पण ही समस्या काही आज उभी नाही राहिली, आणि ना त्यामागची कारणं. तर आज आपण गोष्ट दुनियेची ऐकताना याच एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत – की जगभरातलं पाणी खरंच संपत चाललंय का?
ऐका इथे.
संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
निर्मिती - मोहनलाल शर्मा, मानसी दाश
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - तिलक राज भाटिया
11/20/2021 • 15 minutes, 37 seconds
भाग 2 - आपल्या जंगलांना वाचवण्याची लढाई आपण जिंकू शकतो का?
COP 26 या जागतिक हवामान परिषदेत, जगाच्या तापमानवाढीचा दर कमी करण्याच्या दृष्टीने जगभरातल्या 200 देशांनी काय काय पावलं उचलायला हवीत, यावर चर्चा झाली. यावेळी भारतही 2070 पर्यंत कार्बन न्यूट्रल होईल, असं उद्दीष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर केलं.
पण असं खरंच शक्य आहे का? आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत – की कार्बन न्यूट्रल होण्याच्या दिशेने आपण जंगलं नेमकी कशी वाचवू शकतो?
संशोधन - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
निर्मिती - मोहनलाल शर्मा, मानसी दाश
मराठी निर्मिती - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - तिलक राज भाटिया
11/13/2021 • 16 minutes, 48 seconds
गर्भपाताचा निर्णय कुणाचा – महिलेचा की संविधानाचा?
आज अमेरिकेतील गर्भपाताच्या कायद्याचा इतिहास समजून घेत, आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत - की गर्भपाताच्या बाबतीत अमेरिकेच्या तुलनेत भारतात महिलांची स्थिती चांगली आहे का?